पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/२२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १८. उपसंहार. येथवर अंतरिक्षांतील चमत्कारांविषयीं जी माहिती सांगावयाची होती ती सांगितली. आतां सरतेशेवटीं हे अद्भुत चमत्कार पाहून आणि त्यांचें वर्णन वाचून ज्या विचारलहरी व जे कल्पनातरंग मनांत उठतात त्यांविषयीं दोन शब्द लिहून वाचकांची रजा घेतों. ज्या यंत्रांच्या साह्यानें अंतरालांतील जड पदार्थांचें ज्ञान आपणांस प्राप्त होतें, त्या दुर्बीण व रंगपट्टदर्शक यंत्रांच्या चमत्कारांपासून तों दृष्टसृष्टीच्या सीमेवर असलेल्या धूम- पुंजांचे चमत्कारांपर्यंत आपण आतांपर्यंत माहिती मिळविली. जे चमत्कार पाहून मन थक्क होऊन जातें, बुद्धि कुंठित होते, आणि कल्पनेचीहि गति चालत नाहीं, असे अंतरि- क्षस्थ चमत्कार ज्या शास्त्राचे ज्ञानानें आपणांस कळतात त्या ज्योतिषशास्त्राची थोरवी आतां वाचकांचे लक्षांत थोडीशी