पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ अंतरिक्षातील चमत्कार. सन २०१२ सालीं होईल. तेव्हां, आज जिवंत असणाऱ्या लोकांस यापुढे शुक्रसंक्रमण पाहण्यास कधींच मिळणार नाहीं हे सांगावयास नकोच. शुक्रसंक्रमणाचा देखावा वर्णन कर- ण्यासारखा भव्य किंवा विचित्र असतो असें नाहीं. यापेक्षां शेंडेनक्षत्राचा किंवा पडणाऱ्या ताऱ्यांचा देखावा पुष्कळपटीनें अधिक चित्तवेधक व पाहण्यासारखा असतो. शुक्रसंक्रमणाचा देखावा ह्मणजे एका अत्यंत लखलखीत तेजस्वी वर्तुलावरून काळा ठिपका हळू हळू जातो असे दिसतें. यापरतें विशेष कांहीं नाहीं! असे असतां, शुक्रसंक्रमणास इतकें महत्व कां देतात? हें संक्रमण पाहण्यास शेंकडों विद्वान् हजारों रुपये खर्चून अत्यंत श्रम सोसून पृथ्वीच्या निरनिराळ्या प्रदेशीं कां जातात ? हा प्रश्न साहजिक उत्पन्न होतो. पण, या प्रश्नाचे उत्तर इतकेंच आहे कीं, शुक्रसंक्रमणाचा वेध पृथ्वीच्या निरनिराळ्या भागी घेऊन, सूर्य आपणांपासून किती दूर आहे हें गणितशास्त्राच्या योगानें अगदीं बिनचूक काढितां येतें ! आणि एकवेळ सूर्यापासून पृथ्वीचें अंतर सम जलें; ह्मणजे सूर्य किती मोठा आहे, गुरु वगैरे ग्रह केवढे आहेत, त्यांचे चंद्र-उपग्रह-त्यांपासून किती अंतरावर फिरतात, शेंडेनक्षत्रांचा आकार केवढा आहे, तीं सूर्यापासून दूर जात जात कोठपर्यंत दूर जातात, उल्कातारे किती वेगानें आपल्या पृथ्वीच्या वातावरणांत शिरतात, सूर्यमालेचा विस्तार केवढा आहे, सूर्य- मालेशीं ताडून पाहतां आपली पृथ्वी केवढीशी वाटते, इत्यादि