पान:अंतरिक्षातील चमत्कार.pdf/७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यमाला. असल्या, तरी त्या आपणांपासून इतक्या कांहीं दूर अंतरावर आहेत कीं, त्या आपणांस कधींहि दिसणार नाहींत. मग, त्यांविषयीं विशेष माहिती कशी मिळावी? या विश्वा- मध्यें आपलें वसतिस्थान ह्मटलें ह्मणजे सूर्यमाला होय. कारण कीं, ज्या पृथ्वीवर आपण राहतों तीच पृथ्वी सूर्य- मालेतील एक ग्रह आहे. विश्वामध्ये आपला सर्व संबंध काय तो सूर्यमालेशीं. सूर्यमालेचें जें बरें वाईट तेंच आपलें बरें वाईट. सूर्यमालेचा स्वामी जो सूर्य, तोच आपणांस उष्णता, उजेड, आणि जीवन देतो. सारांश, सूर्यावर आपण सर्वतोपरी अवलंबून आहों. तेव्हां, ज्या मालेंत आपण राहतों, आणि ज्या मालेशी आपला इतका निकट संबंध आहे, त्या सूर्य- माळेंतील मुख्य मुख्य जड पदार्थांविषयी माहिती असणें इष्ट आहे. यास्तव, आतां सूर्यमालेचा स्वामी जो सूर्य त्याकडे प्रथम वळूं.