या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. ९३ काढली. अकबरानें त्याचा पाठलाग करण्याकरितां आपलें सैन्य खाना केलें. तेव्हां अबुलमआलि याचें धैर्य गळाले व तो पळ काढून काबुलास गेला. तेथून त्यानें अकबरास पश्चात्तापपूर्वक प लिहिली. अखेरीस पुढील सालाच्या आरंभी त्यास बकशान येथें कैद केले व फांशी दिलें. अलाहाबादेच्या पूर्वेकडील प्रांतांत मोंगलबादशाहीची सत्ता स्थापित करण्याचे विचार बरेच दिवसांपासून अकबराच्या मनांत घोळत होते; परंतु ते त्यानें इ० स० १९६४ च्या वसंतऋतूपर्यंत अंमलांत आणिले नव्हते. ते वेळीं चनारचा किल्ला हॅ पूर्वेकडील मोठें नाक्याचें ठिकाण ह्मणून समजला जाई व तो अडेल घराण्यापैकीं एका गुलामाच्या स्वाधीन होता. त्याला अकबराच्या एका सरदारानें दम दिल्यामुळें तो किल्ला आपल्या चरणी अर्पण करीत आहे, असें त्यानें बादशहास विनंति- पत्र लिहिलें. अकबरानें आपल्या अमीरांपैकी दोघांत, किल्ला स्वाधीन करून घेण्यासाठीं रवाना केले; व तो किल्ला त्यांनीं आपले हस्तगत करून घेतला. यामुळे, नरसिंगपूर महालाकडे रस्ता खुला झाला. तिचा दरबार या महालाचा राज्यकारभार एका राणीकडे होता. चौरागडचे किल्ल्यांत भरत असे. मोगल सरदारांनी या राणीवर हल्ला करून लढाईत तिचा पराभव केला, व नरसिंगपूर आणि ज्यास सांप्रत आपण हुशंगाबाद जिल्हा झणतों त्यांतील कांहीं भाग बादशाही राज्यास जोडले. त्याच वर्षीच्या उन्हाळ्यांत अकबर शिकारीच्या मिषाने मध्य- हिंदुस्थानांत चालून गेला. पण ते वर्षी पावसाळा लौकर सुरू झाल्यामुळे त्याचे बेत फसले. व वाटेंत पुरानें दोन्ही थडी भरलेले नदी नाले मोठ्या कष्टाने ओलांडून त्यानें नखारची वाट धरली. त्या काळीं हैं शहर मोठ्या भरभराटीचें होतें व त्याचा विस्तार दहा कोसांचा होता अशी त्याची ख्याती होती. या शहराचे आसपास कांहीं दिवस शिकार करून अकबर माळव्याकडे वळला. रावा व सारंगपूर ह्या शहरांवरून