या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९४ अकबर बादशहा. कूच करून तो मोहोच्या नैऋत्येस तेरा कोसांवर मांडू नांवाचें विख्यात शहर होतें तिकडे वळला. येथील सुभेदारीवर एका युझबेक अमी- राची अकबराने नेमणूक केली होती. आपल्यावर नाखूश होण्यास बादशहास कारणें आहेत, अर्से तो जाणून होता. ह्मणून, व बादश- हानें अश्वासनपर पाठविलेले निरोप भरवसा ठेवण्यासारखे नाहींत असें - वाटल्यामुळे, अकबर येऊन पोहोंचला अशी खबर समजतांच तो शहर सोडून आपल्या अनुयायांसह लढाईस उभा राहिला. तेव्हां अकबरानें . त्याची पाठ पुरविण्यासाठी आपले सैन्य रवाना केलें ; त्यांनीं त्याचा - गुजराथच्या सरहद्दी पर्यंत पिच्छा पुरवून त्याचे घोडे, हत्ती व जनानखाना . ही आपले काबीज केली. मांडू येथें अकबराचें स्वागत व आदर आतिथ्य फारच संतोषकारक झालें. बादशहाला मुजरा करण्याकरितां आसपासच्या प्रांतांतून जमीन- दार लोकांचे थवेचे थवे आले; व दूरच्या खानदेशच्या राजानें अकबराचे भेटीकरितां आपला वकील धाडिला. या वकीलाची भेट • अकबराने आदरपूर्वक घेतली. या ठिकाणीं त्या वेळच्या रीतिरिवा- नाचा एक विशेष ह्मणून पुढील गोष्ट सांगितल्यास चालेल. जेव्हां निरोप देण्याकरितां अकबरानें त्या वकीलाची मुलाखत घेतली तेव्हां त्याच्या मालकाच्या नांवानें लिहिलेला एक फरमाना त्याचे हातीं दिला; त्यांत असा हुकूम फरमाविला होता की, आपल्या मुलींपैकी बादशहाच्या महालास अनुरूप अशी एक मुलगी मांडू येर्थे रवाना करून द्यावी. त्या वेळच्या एका इतिहासकारानें लिहिलें आहे कीं " खानदेशचा नबाब मुबारकशहा यास हा अनुग्रहाचा संदेश पोहोंचला, तेव्हां त्याला परमा- नंद झाला व त्यानें आपल्या एका मुलीस योग्यतेनुरूप इतमाम व परि- वार देऊन ताबडतोब बादशहाकडे रवाना केलें, व आपल्या हातून ही चाकरी घेतल्याबद्दल मोठें कृतकृत्य मानिलें." पुढे थोडे दिवस मांडू- . येथें राहून अकबर उज्जयिनी, सारंगपूर, सिप्री, नरवार, आणि ग्वाल्हेर या