या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. : ९५ मार्गानें आग्यास परत गेला. पुढील हिवाळा त्यानें ग्वाल्हेर प्रांतांत बहुतेक शिकार खेळण्यांतच घालविला.. आग्यास जीं कांहीं पहाण्याजोगीं स्थळे आहेत त्यांपैकीं तेथील लाल दगडांनी बांधलेला किल्ला पाहून पश्चिमेकडून ह्मणजे यूरोप खंडां- तून येणाऱ्या प्रवाशांपैकी आश्चर्यानें व कौतुकानें चकित झाले नसतील असे फारच थोडे. अकबर गादीवर बसला ते वेळीं आग्न्यास कायतो विटाचा एक लहानसा किल्ला होता. तो दिसण्यांत विद्रूप असून बेमरम्मत झालेला होता. तो मोडून त्याचे जागीं बादशहाच्या वैभवास अनुरूप असा जंगी किल्ला बांधण्याचा निश्चय अकबरानें कित्येक दिवसां- पूर्वी करून ठेविला होता. इ० सन १९६५ त वसंतऋतूच्या अखेरीस या किल्ल्याच्या इमारतीचा नमूना कायम करून त्याप्रमाणे हुकूम दिला. या कामाची देखरेख कासीमखान नांवाच्या एका विख्यात सरदाराकडे सोपविली होती. हा सरदार तीन हजार फौजेचा अधिपति होता. या किल्ल्याचे कामावर मजुरदार सतत एक सारिखे आठ वर्षेपर्यंत खपत होते. व त्यास एकंदर ३५ लाख रुपये खर्च लागला. या किल्ल्याचा एकंदर पाया पाणी लागेपर्यंत खोल खणिला आहे व तो लाल दगडांनी बांधिला आहे. या दगडांची जुळणी फारच उत्तम तन्हेनें केलेली आहे व त्यांस लोखंडाच्या कड्यांनी ही पण सांधून टाकिलें आहे. हैं वर्ष पुर्रे होण्यापूर्वी एक गोष्ट घडून आली कीं जीमुळे निक-- डीच्या आकस्मिक प्रसंग आपल्या निश्चयाचे बळ व कर्तृत्व दाखवि-- ण्याचा अकबराला प्रसंग आला. बादशहाची स्वारी मांडू येथे गेली, तेव्हां तेथील युझबेक सुभेदार भीतीनें घाबरून पळाला व बंडास उद्युक्त झाला व नंतर अकबराने पाठलाग करून त्याचें पारिपत्य केलें : . याचे निरूपण पूर्वीच केलें आहे. या बंडखोर सरदारास अकबरानें विशेष कडक रीतीनें वागविलें नव्हतें. तथापि आपल्या जातीच्या