या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९६ अकबर बादशहा. लोकांवर बादशहाची नाराजी झाली आहे, असा दरबारांतीक व लष्क- रांतील युझबेक अमीरांच्या मनाचा ग्रह होऊन बसला ; व यांतील दोन चार अमीरांनी मसलत करून अकबराची खोड जिरविण्याचा निश्चय केला. हे बंड पावसाळ्याच्या तोंडास जोनपूर येथें तेथील सुभेदाराच्या मदतीनें उभारलें गेलें. अकबरास ही खबर पोहोंचली तेव्हां नरवार येथें तो हत्तींची शिकार करीत होता. शरण आला. त्याने जोनपूर येथील आपल्या इमानी कामगारांस मदत करण्या- करितां रणशूर योध्यांस देतां आलें तितकें सैन्य देऊन ताबडतोब खाना केलें, व त्यांच्या मागोमाग जाण्याकरितां आपणही सैन्य जमा करूं लागला. सुमारें दहा दिवसांनीं तो तेथून निघाला व कनोज येथे दाखल झाला. या ठिकाणीं बंडखोरांपैकीं एक पुढारी अकबरास त्यास त्याने अभय दिले व पर्जन्य पडल्यामुळे गंगा नदी दोन्ही थडी भरून चालली होती, तीस उतार पडण्याची वाट पहात तो दहा दिवस तेथें राहिला. नंतर बंडखोरांचा मुख्य नायक लखनौकडे गेला अशी बातमी लागतांच तो थोड्याशा पण निवडक सैन्यानिशीं त्याच्या पाठोपाठ निवाला; व एकसारखी चोवीस तास वाट चालून दुसरे दिवश प्रातःकाळीं त्यानें तें शहर गांठलें. हा जवळ येतांच बंडखोरांनीं पळ काढला; तो इतक्या झपाट्याने की लांबचा टप्पा मारून अगदीं थकून गेलेला अकबर व त्याचा परिवार ह्यांच्या त्यांचा पाठलाग करवेना. इतक्यांत बंडखोरांच्या नायकाने मोठ्या जलदीनें जोनपुराकडे माघार घेतली व तेथें आपल्या सोबत्यांस मिळून त्यांसह तो तेथून निघाला, तो छपराचे पश्चिमेस वीस कोसांवर नरहाणच्या उतारानें गोग्रा नदी ओलांडून तेथें तळ देऊन राहिला. येथून बंगालग्या राजास कुमक मागण्याकरितां त्यांने आपले मुखत्यार रवाना केले. इतक्यांत रक्तस्राव न होतां सामानें या बंडाच्या शेवट लागावा. अशी उत्कट इच्छा असलेला एक बादशहाचा सरदार सैन्यासह त्यांचे