या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. पुढे उभा ठाकला ; व दुसरा एक निश्चयाचा व जाज्वल्य स्वभावाचा सरदार : राजपुतान्यांतून उत्तरेकडे त्यांचेवर चाल करून येत होता. पहिल्या ह्मणजे सात्विक नायकार्ने तहाचें बोलर्णे चालणे सुरू करून बहुतेक कलह विझविला होता. पण इतक्यांत राजपुतान्यांतील सरदार त्या ठिकाणी येऊन पोहोंचला, व हें तहाचें बोलणें ह्मणजे केवळ थोतांड आहे असे प्रतिपादून त्याने लढाईचा आग्रह धरिला. नंतर युद्ध झालें, त्यांत बादशाही सैन्याचा पराजय झाला, व त्यांनी पळ काढला आणि दुसरे दिवशीं ते शरगड येथें पुनः जमा झाले. ही लढाई होण्यापूर्वीच अकबराने तहाचीं कलमें मंजूर केली होती. बंडखोरांनीं आपल्या सैन्याचा पराभव केला, ही बातमी समजली अस- तांही त्यानें आपले वचन माघारें घेतलें नाहीं. तो ह्मणाला त्यांस क्षमा केली ती केली. ह्मणून त्यानें आपल्या अमीरांना दरबारांत परत येण्यास सांगितलें. नंतर तो चनाराकडे वळला. उद्देश, तेथील किल्ल्याच्या मजबुतीकरितां तजवीज करावयाची होती, दुसरें, मिरझापूर • जंगलांत हत्तीची शिकार मारावयाची होती, आणि तिसरें, या युझबेक . बंडखोर लोकांस निःशस्त्र न करितां क्षमा केली होती ; तेव्हां ते पुढे कसे काय वागतात हैं पहावयाचें होतें. या शेवटच्या गोष्टी संबंधानें अनुभव एकवारच घेण्याजोगा होता; कारण विजयामुळे स्फुरण पाव- लेल्या त्या बंडखोरांचे नायकांनी पुनः उचल घेतली. तथापि, अक- बराने आपल्या सैन्याची हिकमतीनें व करामतीनें योजना करून त्यांस अशा रीतीनें चोहोंकडून घेरलें कीं ते निरुपाय होऊन शरण आले. नंतर त्यांस क्षमा करून पुनः मर्जीत घेतलें. याच वर्षों बादशाही सेनापतींनीं बिहार प्रांतांतील रोटास नांवाचा किल्ला काबीज केला; व ओरिसाच्या राजाकडे शिष्टाईकरितां जे दिल्लीच्या दरबारांतून वकील गेले होते ते. मूल्यवान व अपार नजराणे घेऊन परत आले. ० इ० सन १९६६ च्या वसंत ऋतूंत अकबर बादशहा आप्पास परत 13