या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९८ अकबर बादशहा. आला. तत्कालीन इतिहासकार असें सांगतात कीं, या शांततेच्या समयीं अकबरास सायंकाळी चौगन नांवाचा खेळ खेळण्यांत उल्हास वाटे. चौगन ह्मणजे सांप्रतचा पोलो नांवाचा खेळ; हा हिंदुस्थानांतून यूरोपखंडांत गेला. सांप्रत ज्याप्रमाणें सर्व देशांत हा खेळ खेळतात, त्याप्रमाणेच अकवरही दिवसाउजेडी तो खेळत असे. परंतु अंधान्या रात्रींही - कारण इकडे पुष्कळदां रात्र तेव्हांच पडते-हा खेळ खेळतां यावा अशी त्यानें युक्ति काढिली. पळसाचें लांकूड हलके असून फार वेळ जळतें. त्याने ह्या लांकडांचे चेंडू करवून ते पेटवून त्यांनीं खेळावे. ह्या खेळांत अकबराची फारच चलाखी असे, अशी त्या वेळीं ख्याती होती. या मौर्जेत व आरामांत अकबर अगदीं निमग्न असतां लाहोरांत व काबुलांत बंडाचा उद्भव होऊन बंडवाल्यांची सरशी झाली, अशी खबर येऊन धडकली. तेव्हां मोटी लगबग करून सालअखेरीस तो सतलज- नदीचे दिशेने निघाला, व दहा दिवसांत दिल्लीस येऊन पोर्हो- चला. तेथून त्याची स्वारी सरहिंदाकडे वळली, आणि पुढे मोठ्या उल्हासानें तो लाहोरास गेला. तेथून त्यानें आपले सेनापति बंड- खोरांस सिंधुनदाचे पार पिटाळून लावण्यास खाना केले; व ही कामगिरी बजावून ते परत आले त्याच वेळीं काबुळांतील बंडावा शांत झाल्याची खबर आली; पण उलट ताप असा झाला कीं, बादशाहाची स्वारी लांब वायव्येकडे गेली आहे, असें पाहून जोनपूर येथील बंडवाल्यांनी पुनः उचल खाल्ली. यावरून हे उघड होतें, कीं भरतखंडांत चिरस्थायी राज्याची स्थापना कशी करावी, हें जें महत्वाचें कोर्डे तें सोडविण्याचे यश हा कालपात्रेतों, ह्मणजे इ० सन १९६६ च्या अखेरपर्यंत, अकबरास प्राप्त करून घेतां आलें नव्हतें. पानिपतची लढाई झाली, तेव्हांपासून मोजलें असतां, अकबराच्या राजवट्याचें अकरावें वर्ष आतां संपत आलें होतें; तथापि त्यानें आपल्या राज्यद्रुमाची मुळे भरतभूमीत इतकी थोडी रुज-