या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ ना. ९९ तेथें तो शिका- विली होतीं कीं, कर्मधर्मसंयोगाने जर त्यावर एखादा जिवावरचा अपघात गुदरला असता, तर त्याचेनंतर राज्यपद कोणास मिळावे याचा निर्णय पुनः तरवारीच्या धारेनेंच ठरविण्याची पाळी येऊन ठेपली असती. इ० सन १९६७ च्या प्रारंभी अकबर लाहोरातच होता. रींत व दुसऱ्या अशाच प्रकारच्या चैनींत गर्क होता. या आरामांतून तो जागा होण्यास कारण झालें कीं, ज्या युझबेक अमीरांना त्याने दया बुद्धीनें क्षमा केली होती, ते कृतोपकार न स्मरतां बादशहाची स्वारी फार दूर गेली आहे, अशी संधि पाहून बंडास उद्युक्त झाले. नंतर, तारीख २२ वर सांगितल्याप्रमाणे पुनः मार्च रोजी लाहोर सोडू मार्गांत, सरहिंद प्रांतांत बादशाहा आग्र्यास परत जाण्यास निघाला. ठाणेश्वर येथें सन्यासी व. जोगी ह्यांच्यांमध्ये मोठी मारहाण झाली ती पाहून त्याला एक मोठी मौज वाटली. तेथील प्रसिद्ध देवस्थानांत भक्ति- मान् यात्रेकरू मौल्यवान् जत्राहीर व नानाप्रकारचे सोन्याचांदीचे दागिने वस्त्रप्रावरणें अर्पण करीत त्यांवर हक्क कोणाचा या विषयीं या उभय पंथांच्या लोकांत कलह माजून हातवाईवर प्रसंग आला. असो. अक- बर दिल्लीस दाखल झाला तेव्हां आपल्या राज्याच्या अस्थैर्यतेचें दुसरें एक उदाहरण त्याचे नजरेस आलें. तेथील राजकीय कैद्यांपैकी एक रख- वालदारांच्या डोळ्यांत धूळ टाकून पळून गेला होता. तेव्हां आतां बादशहाची मर्जी आपल्यात्रर खना होईल, या भीतीनें तुरुंगावरील मुख्य अधिकारी शहरांतून पळून गेला व त्याने बंड उभारलें. तो आग्र्यास पोहोंचला तेव्हां देखील वरील बातमीपेक्षां अधिक अश्वासनपर बातमी त्याचे कानी आली नाहीं. कनोज सभवतील प्रांतांत बंडावा उद्भवला होता आणि आपल्या जवळील पुष्कळ अमीर भरंवसा ठेवण्याजोगे नाहींत, असें अकबरास स्पष्टपणे कळून चुकलें होर्ते. या ऐन बाणीच्या प्रसंगीं तो रायबरेली जिल्ह्यांत भोजपुरास गेला व तेथून पुढे रायबरेलीस खाना झाला. तेथें त्यास अशी बातमी