या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० अकबर बादशहा. लागली की, बंडखोर लोक काल्पीस जाण्याच्या इराद्यानें गंगानदी उत- रून गेले आहेत. जलमय झालें होतें. झाला होता. सबब पर्जन्याची अतिशय झड लागल्यामुळे चोहोकडे परंतु अकबर लढाई करण्यास अगर्दी उत्सुक सैन्याचा मुख्यभाग कराकडे आपण स्वतः निवडक सैन्यानिशीं मोठ्या त्वरेनें प्रतापगड आणि अलाहाबाद ह्यांचे दरम्यान माणिकपुराकडे वळला. तेथें हत्तीवर बसून अकबरानें गंगानदी ओलांडिली व झपाट्यानें चालून जाऊन माणिकपूर येर्थे बंडखोरांस गांठलें, व त्यांचा समूळ पराभव केला. बंडखोरांचे पुढारी लढाईत किंवा लढाईनंतर मारले गेले. समरांगणांतून निघून अकबर अलाहाबादेस गेला. त्यावेळी ही नगरी प्रयाग या नांवानें विश्रुत होती. तेथून तो बनारस व जोनपूर येथे गेला, व सुव्यवस्था स्थापित करून आग्र्यास परतला. पूर्वेकडील प्रांत आतां निर्भय आहे, असे समजून अकबराने आपलें लक्ष राजपुतान्याकडे वळविलें. पश्चिम हिंदुस्थानच्या या विस्तीर्ण प्रदेशांतील राजांपैकीं सर्वात पुरातन घराण्यांतील मेवाडचा राणा उदेसिंग हा होता. त्याचा स्वभाव मोठा विलक्षण होता. तो निश्चयी किंवा त्याचे मोठ्या हिंमतीचें हा इ० सन १३०३ या जोमदार नव्हता पण मोठा दुराग्रही असे. ठिकाण ह्मणजे चितोरचा विख्यात किल्ला. सालीं अल्लाउद्दीन खिलजी यार्ने काबीज केला होता, हें खरें; तथापि तो अभेद्य आहे अशी पुनः लवकरच त्याची ख्याति झाली. हा किल्ला बनास नांवाच्या नदीच्या कांठीं एका उंच चतुष्कोण टेकडीवर आहे. व याच्या बाहेरील तटाची भिंत टेंकडीच्या आकाराचीच बांधलेली आहे. यांच्या संरक्षणाकरितां सात हजार शूर रजपूत शिपाई ठेविले होते. त्यांच्यावरील सेनापति मोठा स्वामिभक्त व घाण्याचा सरदार होता. किल्ल्यांत अन्नसामुग्री व पाणी यांचा विपुल पुरवठा असल्यामुळे शत्रूंचा वेढा दीर्घकालपर्यंत पडला तरी तो सर्व प्रकारें टिकाव धरण्याजोगा होती.