या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा १०१ खुद्द अकवर सैन्यानिशीं किल्ल्याच्या तटापुढे तळ देऊन बसला. आणि त्यानें आपल्या सैन्याची दुसरी एक टोळी आसपासचा प्रांत काबीज करण्याकरितां पाठविली; कारण राण्यानें निराश होऊन जंग- लांत पळ काढिलेला होता. इकडे अकबराने जितक्या कडाक्यानें व निकराने किल्ल्यावर गर्दी करावी तितक्याच शौर्यानें व आग्रहानें आंतील रजपूत वीरांनीं त्याचें रक्षण करावें. वीरांशी यापूर्वी कधीं गांठ पडली नव्हती. अकबराची असल्या कडव्या जसजसा या शूर वीरांचा अहंकार व दृढनिश्चय ही निग्रह वाढत चालला, तसतसा अकबराचा अधिकाधिक झाला. शेवटी, तटास खिंड पाडून प्रवेश करतां येण्या- सारखा आहे, अशी बातमी लागली; व अकबरानें लागलींच मार्च महिन्यांत रात्र हल्ला करण्याचा हुकूम दिला. त्यानें आपणास उभे राहण्यासाठीं एक माळा तयार करविला; व त्यावर उभे राहून किल्ला सर करण्याच्या कामावर नजर ठेवून तो सैनिकांस हुकूम देई. या ठिकाण हातांत बंदूक घेऊन अकबर बसला असतां आपल्या सैनि- कांस मनःपूर्वक स्वागत देण्याच्या तयारीनें रणधीर रजपूत योद्धांच्या झुंडीच्या झुंडी तटांतील खिंडीपाशी त्यांच्या कार्यक्षम सेनानीच्या हाता- खालीं जमा होत आहेत असें त्याच्या दृष्टीस पडलें. त्याचा माळा व तटांतील खिंड यांत सरळ रेषेने फार अंतर नव्हते; कारण त्यांच्या दरम्यान नदीच कायती आडवी होती. मशालीच्या उजेडानें अकबराने रजपुतांच्या सेनापतीस सहज ओळ- खिलें ; व तो गोळीच्या टप्यांत आहे असें पाहून अकबराने त्यावर नेम धरून बंदूक झाडली; त्याबरोबर तो रणशूर सरदार किहल होऊन उभय पक्षांकडील सैनिक सामना करण्याकरितां एकमेकांवर चाल करून जात होते ; इतक्यांत ही भाग्याची गोळी सुटली, व तिच्या योगार्ने रजपूत इतके निराश झाले की ऐन आणीबाणीच्या वेळीं 'त्यांचें धैर्य खचलें व लढाईचा जोम गेला. पुढे ते सांवरले, हें खरें; पडला.