या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०२ अकबर बादशहा. वाळपणापासून खिळलेल्या धर्म- त्यानें अजमीर येथे दहा दिवस पण वेळ गेली ती गेली. त्यांनी मागाहून पुष्कळ पराक्रम केला, पण तो निष्फळ झाला. दुसरे दिवशीं प्रभातसमयीं चितूरच्या किल्ल्यावर सूर्य- प्रभेबरोबर अकबराचें निशाण झळकूं लागलें. चितूरास वेढा घालण्या- पूर्वी अकबरानें हिंदुस्थानांतील पहिला मुसलमान साधु चिजिस्थानचा मैनुद्दीन चिस्ति यास नवस केला होता. तेव्हां जय मिळाल्यावर उतराई होऊन नवस फेडण्याकरितां तो अजमीरच्या टेंकडीवर त्याच्या कबरेच्या दर्शनास पायीं चालत गेला. समजुती अद्याप त्याचे आंगीं होत्याच. मुक्काम केला; व नंतर मेत्रातच्या मार्गानें तो आग्र्यास परत गेला. या वर्षाचा वसंतकाल व वर्षाकाल अकबरानें आग्र्यांतच घालविला. पुढे जयपूर संस्थानांतील रणथंबोर नांवाचा बलाढ्य किल्ला काबीज कर- ण्याचा त्यार्ने विचार केला. परंतु, या कामगिरीवर पाठविलेले सैन्य कूच करीत असतां, गुजराथेंत दंगे उद्भवले, व तिकडूनच मध्य हिंदुस्था- नावर स्वारी आली. तेव्हां हें अरिष्ट निवारण करण्याकरितां त्या सैन्याची या कार्याकडेस योजना करावी लागली. नंतर अकबराने दुसरें सैन्य जमा करून रणथंबोरच्या किल्ल्यावर चाल करून जाण्याचा निश्चय केला. ही स्वारी १९६९ च्या प्रारंभ झाली. किल्ला जेरीस येऊन हस्तगत होतांच अकबर आग्र्यास परत जाण्यास निवाला. मार्गात त्यानें मैनुद्दीन चिस्तीच्या कबरेचें पुनः दर्शन घेण्याकरितां एक आठवडाभर अजमीरास मुक्काम केला. यावर्षी त्याने फत्तेपूरशिक्री या नांवाचें शहर वसविलें. सांप्रत या नगरीची शोभा व वैभव नष्ट झालें आहे तथापि तिचीं अवशिष्ट राहिलेली गत वैभवाचीं चिन्हें अर्शी चित्तस्थंत्रक आहेत कीं तीं पाहून प्रवाशांची चित्तवृत्ति आश्चर्यानें विस्मित झाल्याशिवाय राहत नाहीं. ही नगरी कशी निर्माण झाली याची हकीकत तत्राकतनाम्यांत दिली आहे. ती अशी:—अकबरास आवळीं जावळीं अशीं दोन मुलें होतीं ; परंतु तीं ..