या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर बादशहा.

बाबराच्या मुलाला हार खावी लागली ती त्याहून अधिक चतुर योद्धा व मुत्सद्दी अशा शेरखानसूर नांवाच्या सेनापतीपुढे. त्यानें त्याच्या जार्गी आपकी सत्ता पूर्णपणे स्थापिली. परंतु, त्याचे अंगीं जरी अलौ- किक बुद्धिसामर्थ्य होर्ते, तरी मोंगलांच्या व विशेषतः हिंदुस्थानांतील लोकांच्या सुदैवाने राष्ट्र स्थापन करण्याच्या कलेसंबंधों, पूर्वी होऊन गेलेल्या अफगाणसरदारांच्या विचारांत व याच्या विचारांत अणूरेणूचा देखील फरक नव्हता. हिंदुस्थानांतील कोट्यावधि प्रजाजनांना आपलेसें करून घ्यावे हा विचार, ती पद्धति अनुसरणान्यांच्या मनांत येतच नसे. आपण काबीज केलेल्या प्रांतांत छावण्या देऊन सैन्याच्या जोरावरच कारभार चालविण्यांत शेरखान यार्नेही समाधान मानिलें. याचा परिणाम असा झाला कीं, शेरखानसूर मरण पावतांच, दुसरे लोक हिंदुस्थानचे राज्य संपादन करण्याच्या चढाओढींत शिरले. यामुळे थोडक्याच वर्षात इतका गोंधळ उडाला की इ० स० १५५४ या वर्षी - कनोज येथील समरांगणांतून पळ काढल्यापासून बरोबर चवदा वर्षांनीं - हुमायुनानें पुनः सिंधुनद ओलांडून उत्तरहिंदुस्थान आणखी एकदां सर केला. अझूनही त्यास तारुण्याचा जोम होता; तथापि चिरस्थायी राष्ट्र स्थापन करण्याची योग्यता तो आपल्या बापानंतर गादीवर बसला त्यावेळी जशी त्याला नव्हती, तशी आतांही पण नव्हती.
 हुमायुनाच्या हातचे अनेक लेख आहेत. त्यांवरून इतके सिद्ध होतें कीं, ईश्वर कृपेनें तो ज्यास्त दिवस वांचता तरी, पूर्वी होऊन गेलेल्या हिंदुस्थान जिंकणाऱ्या योद्धघांच्या हातांत ज्या राज्य व्यव-स्थेचा फन्ना उडाला व त्याच्या स्वतःच्या हातांत देखील जिचा चुराडा झाला, तीच व्यवस्था पुनः स्थापित करून राज्य चालविण्याचा त्यार्ने प्रयत्न केला असता. मरणापूर्वी थोडे दिवस त्यानें हिंदुस्थानच्या राज्याची एक नवी व्यवस्था योजिली होती. ही पद्धति ह्मणजे नाक्याच्या ठिकाणी छावण्या देऊन सैन्याच्या जोरावर राज्य करण्याची