या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १९ वा. १०३ दोघेंही लवकरच मरण पावली. नंतर आग्र्याच्या नैर्ऋत्येस १३ कोसां वर शिक्री येथें शेख सलीम चिस्ति नांवाचा एक अवलिया राहत असे. त्यानें अकबरास असा आशीर्वाद दिला की " तुला दीर्घायू पुत्र होईल व तो तुझ्यामार्गे गादीवर बसेल." हा आशीर्वाद खरा होईल अशी पूर्ण आशा धरून रणथंबोराहून परत आल्यावर अकबर या अवलियाचे भेटीकरितां अनेक वेळां गेला. व कधीकधी तर तेथें त्यानें दहा दहा, वीस वीस दिवसांचे मुक्काम केले. अखेरीस तेथें एका उंच- वट्याच्या माथ्यावर त्यानें एक राजवाडा बांधिला. याच्या सन्निध त्या अवलियाने एका भव्य व सुंदर मशीदीचे कामास सुरवात करून त्याच्या - पलीकडे एका नवीन फकीर -खान्याचे काम लाविलें. पुढें, 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायानें दरबारांतील अनेक अमीर उमरावांनीही आप- आपले महाल त्या ठिकाणी बांधण्यास प्रारंभ केला. राजवाड्याचे काम चाललें असतां अकबराच्या जनानखान्यांतील एक राणी गरोदर राहिली; तेव्हां त्याने तिला त्या अवलियाच्या आश्रमांत नेऊन ठेविलें. कांहीं दिवस लोटल्यावर त्यानें गुजराथ जिंकिली ; तेव्हां या आवडत्या नगरीच्या नांवास 'फत्तेपूर' हें पद जोडिलें. तेव्हां- पासून हे शहर इतिहासांत फत्तेपूर - शिक्री या संयुक्त अभिधानानें विख्यात आहे. शिक्री येथे राहण्यास पाठविलेल्या राणीस साल- अखेरच्या सुमारास त्या अवलियाच्या आश्रमांत पुत्ररत्न झाले. हा मुलगा जहानगीर बादशाहा या नांवानें इतिहासांत प्रसिद्ध आहे, तथापि त्याचें खरें नांव त्या अवलियाच्या नांवावरून दिलेलें सेलिम हे होय. त्याची आई जोधपुराच्या रजपूत दायक दिवसाच्या स्मरणार्थ ह्मणून, कायमची राजधानी केली. त्या राजाची कन्या होती. या आनंद- अकबरानें फत्तेपूर - शिक्री ही एक शहराचे सभवर्ती दगडी परिकोट बांधिला. व त्यांत अनेक प्रकारच्या सुंदर व भव्य इमारती ● उभारिल्या. नंतर तो आणखी एकदां अजमीरच्या टेकडीवरील .