या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ अकबर बादशहा. कबरेच्या दर्शनास पाय गेला; व तेथील यात्रा करून तो दिल्लीस गेला. पुढील वर्षाचे प्रारंभीं अकबर राजपुतान्यांत चालून गेला; व त्यानें जोधपूर संस्थानांतील नागोर शहरों मुक्काम केला. तेथें त्या वेळीं सर्वांत बलिष्ट अशा रजपूत संस्थानच्या ह्मणजे जोधपूरच्या राजाच्या मुलानें अकबराचे प्रभुत्व मान्य केलें. तसेंच विकानेरचा राजा व मुलगा ह्यांनीही आपलें सामंत्य कबूल केलें. या दुसऱ्या राजाची स्वामिभक्ती पाहून झालेली प्रसन्नता अकबराने त्याच्या मुलीचें पाणिग्रहण त्यानें कांहीं दिवस नागोर येथें त्या वेळीं जंगली करून व्यक्त केली. गर्धर्भे असत, त्यांच्या शिकारीच्या करमणुकींत घालविले. नंतर तो पंजाब प्रांतांत दिपालपूर येथें गेला व तेथें त्याने एक मोठा भव्य दरबार भरविला. नवीन वर्ष लागतें न लागते इतक्यांत तो लाहोरास गेला. तो पंजाबांत स्थिर स्थावर करून पुढील वर्ष गुजराथ काबीज करण्य घालविण्याच्या उद्देशानें फत्तेपूर शिक्री येथें परत आला. अकबराच्या वेळीं गुजराथची सीमा फार विस्तीर्ण होती, व त्यांत सांप्रतच्या सुरत, भडोच, खैरा, व अहमदाबाद या जिल्ह्यांचा समावेश होत असून हल्लींचें गाईकवाडी राज्य ही त्यांत येत असे. या शिवाय, सांप्रतचा महिकांठा व रेवाकांठा या प्रदेशांखालीं मोडणारा प्रांत, पंचमहाल, सधनपूर, पालनपूर, बलीसना, खंबायत, खंडिया आणि काठे- वाडचें द्वीपकल्प ह्रींही त्यांत येत असत. ह्या प्रांतसमुच्चयांचा • बऱ्याच दिवसापासून कोणी खरा व हक्काचा असा शासनकर्ता प्रभु नव्हता. या प्रदेशाचे अनेक विभाग केलेले होते व त्या प्रत्येकावर • लोक समुदायास परकीय अशा मुसलमान अमीरांचा अंमल असे. आणि • ह्मणून हा प्रांत वर्षोगणती आपआपसांतील लढायांनी केवळ संत्रस्त झालेला होता. प्रत्येक सरदाराची खटपट इतरांवर व त्यासाठी तो रयतेस पिळून काढी. •ण्याची ; स्वामित्व संपाद- कधीकधी शेजारचा