या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १०५ संस्थानिक कमजोर व र्लेचापेचा असल्याची खबर समजली असतां, हे संस्थानिक भरीस पडून संगनमत करून त्या दुर्बळावर हंगामी स्वाय चालवीत. या एकंदर गोष्टींचा असा परिणाम झाला की, गुजराथ हैं दंग्याधोप्याचें व धामधुमीचें मोठें आगर व उत्पत्तिस्थान होऊन बसलें.. प्रजेवर नेहमीं जुलूम होत असे, व त्यांच्यावरील राजे सतत दुसऱ्याचें नुकसान करून आपले हित साधण्यांत तत्पर असत. या बेबंद स्थितीचे परिणाम खुद्द अकबराच्या अनुभवास पुष्कळ दिवसांपूर्वी येऊन चुकले होते, व तिर्चे निर्मूलन करण्याचा त्यानें आतां निश्चय केला. अकबराच्या कारकीर्दीत जे मोठमोठे युद्धपराक्रम गाजले, त्या सर्वात गुजराथची मोहीम अति विख्यात आहे. या स्वारीच्या योजनेंत किंवा प्रवर्तनेंत कोणत्याही प्रकारची चुकी होऊं नये, याविषयीं त्यानें पक्की खबरदारी घेतली होती. हिंदुस्थानांतील बऱ्याच भागाचें अधि- पत्य अकबराकडे आल्यापासून आपआपले अमीर उमराव व संस्थानिक आपल्याशी इमाने इतबारें वागतील, अशी खात्री त्यास याच वेळेस प्रथमतः वाटली. तो इ० सन १९७२ चे सेप्टेंबर महिन्यांत सैन्य घेऊन फत्तेपूर शिक्रीहून निघाला. जयपूरच्या दक्षिणेस ९ को संगमनेर आहे त्याचे मार्गाने वाट चालून तो अक्टोबर महिन्याचे मध्य- भार्गी अजमीर येथें दाखल झाला. या ठिकाणीं त्यानें दोन मुक्काम करून तेथील अवलियाच्या कबरेचें दर्शन घेतलें. नंतर, मार्ग टेहळ- ण्याकरितां त्यानें १०००० घोडेस्वार अघाडीस खाना करून मागाहून स्वतः सर्व दळभारासमेत जोधपुराच्या ईशान्येस ७५ मैलांवर नागोर येथें गेला. तेथें दाखल झाल्यावर बादशहास पुत्ररत्न झाल्याची खबर एका जासुदानें आणिली. हा मुलगा शहाजादा दानियल या नांवानें इतिहासांत प्रसिद्ध आहे. या ठिकाणीं त्यानें १४ दिवस मुक्काम .करून सैन्याकरितां सामानसुमान व दाणागोटा यांची तरतूद लाविली. नंतर जो चाल करून निघाला तों नोवेंबर महिन्यांत सरस्वतीच्या तीर 14