या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ अकबर बादशहा. पट्टणास जाऊन पोहोंचला, व दिसेंबर लागतांच अहमदाबाद येथें दाखल झाला. पट्टणहून अहमदाबादेस जात असतां मार्गात नांवानें गुजराथचा सार्वभौम राजा असें ह्मणविणारा एक संस्थानिक त्यास शरण आला. अहमदाबाद हें ते वेळीं गुजराथेंत पहिल्या प्रतीचें शहर होर्ते. तेर्थे अकबर हा पश्चिम हिंदुस्थानचा बादशहा ह्मणून द्वाही फिरविली गेली. 'इतके झाले तरी अद्याप पुष्कळ सरदारांशीं प्रसंग करावयाचा राहिलाच होता. अर्थातच ते आपली सत्ता सोडण्यास नाखून होते. यांच्या- मध्ये भडोच, बडोदें, आणि सुरत येथील संस्थानिक मुख्य होते. ह्मणून अहमदाबादच्या हाताखालील प्रांताची सुव्यवस्था लागतांच बादशहा संत्रायतेस जाण्यास निघाला तेथें तो पांच दिवसांत पोहोंचला. इतिहासकार ह्मणतात कीं त्यानें समुद्र कसा असतो, तो प्रथमतः येथें पाहिला. तेथें आठवडाभर मुक्काम केल्यावर दोन मजलांनीं तो बडो - द्यास गेला. तेथें त्यानें एकंदर प्रांतांच्या कारभाराची व्यवस्था पुरी केली. अहमदाबाद ही त्या इलाख्याची राजधानी ठरविली; व आपल्या समागमें आग्र्याहून आलेल्या सरदारांपैकीं एकाची तेथील सुभेदारीवर नेमणूक केली. येथूनही त्याने भडोच व सुरत काबीज करण्या- करितां सैन्याची रवानगी केली. भडोच येथील सुभेदारार्ने तेथे असणाऱ्या मोंगलांच्या पक्षांतील मुख्य सरदारास मारून आंत देशांत पळ काढला, व तो बडोद्यावरून सुमारें सात कोसांच्या अंतरानें निघून गेला. तेव्हां अकबराने जवळ होतें इतक्यांत अशी बातमी आली की, तें सैन्य घेऊन त्याचे पाठोपाठ दौड केली. दुसरे दिवशीं रात्र एका लहान नदीच्या पलीकडे शत्रूंनीं सारस मुक्कामीं तळ दिला होता, तेथें तो दाखल झाला. यावेळीं अकबराबरोबर कायते ४० घोडेस्वार होते. नदीला उतार होता ह्मणून सैन्याची कुमक येऊन पोहोंचेपर्यंत त्याने आपले जवळचे. लोक किती आहेत तें लपवून ठेवण्याचा प्रयत्न चालविला. ही कुमक