या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १०७ सरासरी साठ स्वारांची टोळी - रात्रीं येऊन पोहोंचली. नंतर आपल्या सैन्यांत शंभर सैनिकांची भरती आहे असें पाहून अकबराने ह्यांना घेऊन आपल्यापेक्षां दसपट मोठ्या सैन्यावर हल्ला करण्याकरितां ती नदी ओलां- डिली. बंडखोरांचा मुख्य सेनापति गांवांत राहून हल्ल्याची वाट न पाहतां आपल्या मोठ्या सैन्यास चांगली संधि सांपडावी, या हेतूनें उघड्या मैदानांत जाण्यास निघाला. इतक्यांत अकबरानें दौड करून शहर काबीज केलें ; नंतर मोठ्या सपाट्याने शत्रूंचा पाठलाग सुरू केला. परंतु हा प्रदेश अनेक अरुंद वाटांनीं अडून गेला होता व ह्यांच्या दोन्ही बाजूंस निवडुंगाचें दाट कुंपण होतें. यामुळे अकबराच्या घोडे- स्वारांना हटावें लागलें व शेवटीं ते उभे राहिले ते अशा ठिकाणीं की फक्त तिघांनाच कायतें दंडाला दंड असें उभे राहून लढतां येई. बाद- शहा आपल्या लोकांच्या अप्रभाग होता, व दोन्ही बाजूस जयपूरचा प्रतापशाली राजा राणा भगवानदास, ज्याच्या बहिणीचें अकबरानें पाणि- ग्रहण केलें होतें, तो व त्याचा पुतण्या व पुढें गादीचा मालक राणा मानसिंग हे उभयतां त्याचे पार्श्ववर्ती होते. राणा मानसिंग हा त्या काळच्या अति प्रसिद्ध योध्यांपैकी एक होता. या त्रिवर्गांवर अति एकदम हल्ला करण्या- दुर्घट प्रसंग येऊन गुदरला; कारण यांच्यावर करितां शत्रूकडील मंडळींनीं भयंकर खटपट चालविली होती. परंतु नीं निवडुंगाचीं कुंपर्णे सैन्याची योजना करण्यास विरोधकारी झाल होतीं, तींच आतां शत्रूस अभेद्य असा तट बनून राहिलीं. इत- क्यांत, राणा भगवानदास याने शत्रूकडील एका प्रबल व अग्रणी सैनिकास आपल्या भाल्यानें चीत केलें व पुतण्या मानसिंग व अकबर या उभयतांनीं प्रतिपक्षाकडील आणखी दोन योध्यांचा निकाल लाविला; तेव्हां शत्रूंच्या सैन्यांत एकदम क्षणिक गोंधळ व हाहाकार उडून गेला. ती संधि पाहून हे त्रिवर्ग वीर मोठ्या त्वेषानें त्यांवर चाक करून पुढे डोके व आपल्या बादशहाचें जीवित धोक्यांत आहे, असें पाहून