या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ अकबर बादशहा. आपला अलौकिक पराक्रम करण्यास प्रवृत्त झालेल्या आपल्या लोकांच्या अचाट शौर्याच्या सहाय्यानें त्यांनीं शत्रूस पळ काढावयास लाविलें. पक्ष बुडता आहे अर्से बंडखोरांचे अनुयायांस समजून चुकल्याने त्यांनी . अकबराच्या शिपायांप्रमार्णे धैर्य व निग्रह मुळींच दाखविला नाहीं. त्यांनी रणांगणास व त्याबरोबर हिंमत व पराक्रम यांसही रामराम ठोकिला. ज्याला जशी संधि मिळाली त्याप्रमाणें त्यानें यः पलाय केलें. शेवटीं आपले सैन्य पळून गेल्यामुळे खुद्द बंडास उद्युक्त झालेल्या पुढाऱ्यानें राजपुतान्यांत सिरोहीकडे, साधेल त्या करामती करून, पळ काढला. या अवकाशांत भडोच मोंगलांच्या कायर्ते एकटें काबीज करण्याचे राहिलें. हस्तगत झालें, तेव्हां सुरत ह्मणून, आतां वर्णन केलेल्या मोहिमेहून परत आल्यावर अकबर हा, पुढे त्याच्या मुलाच्या व नात- वाच्या अमदानीत इंग्रजी व्यापाऱ्यांना फार उत्तम तन्हेनें माहित झालेल्या ह्या शहरावर, स्वतः चालून गेला. त्या काळीं विदित असलेल्या तट भंग करण्याच्या साधनांना सुरतेचा किल्ला अभेद्य होता. पण, अकबरानें नेटाने वेढ्याचा जोर केला व धीमेपणानें तो एक महिना सतरा दिवस चालू ठेविला. नंतर आंतील सैन्य सर्व सामुग्री संपून गेल्यावर वश झालें. तेथें अकबर गुजराथ प्रांतांतील राज्य- व्यवस्था मार्गाला लावण्यास पुरे इतके दिवस राहून आग्र्यास परत जाण्यास निघाला; व सरासरी नऊ महिने ह्या मोहिमेकरितां बाहेर राहून तारीख ४ जून सन १९७३ रोजीं आग्र्यास दाखल झाला. सुरतेस वेढा घालून किल्ला काबीज करण्याच्या उद्योगांत अकबर गुंतला असतां जो मुख्य बंडखोर सारस येथें पराभव पावून सिरोही येथें पळून गेला होता, तो उपद्रव देण्याच्या इराद्यानें हालचाल करूं लागला. दुसरा एक असंतुष्ट व बलाढ्य अमीर त्यास जाऊन मिळा- त्यांनें तो पाठणावर चाल करून गेला. ह्या शहराजवळ त्याचा. व बादशाही सैन्याचा सामना झाला. त्यांत मोंगल सैन्याची बहु