या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १०९ तेक पिच्छेहाट झाली होती. पण इतक्यांत बंडखोरांचे स्वार लुटी- करितां चोहोंकडे फांकले. ही संधि पाहून मोंगलांचें सैन्य पुनः सावरून एकत्र झाले व त्यांनीं शत्रूंच्या मुख्य भागावर तुटून पडून पराभव होणार होता त्या ऐवर्जी जयश्री संपादिली. सुरतेचा वेढा चालला असतांनांच ही पराक्रमाची वार्ता अकबराच्या कानी आली. इतकें झालें तरी मुख्य बंडवाल्याची खुमखुम जिरली नव्हती. आपल्या- कडून होईल तितका मोंगलांना उपद्रव करण्याचा कृतनिश्चय करून त्यानें राजपुतान्यांतून पंजाबचा मार्ग धरिला. रस्त्यांत दोन तीनदां त्याचा पराभव झाला. परंतु त्यांतून तो एकसारखा जीव बचावून सुटून गेला, व रस्त्यांत सोनपतपानिपत व कर्नाल हीं शहरें त्यानें लुटली. पंजाबात बादशाही सैन्याची व त्याची गांठ पडली, तेव्हां तो पराभव पावला आणि आश्चर्य उत्पन्न करणारी कांहीं धाडस कृत्यें केल्यावर मुलतानजवळ एका धीवराच्या टोळीचे हातून तो घायाळ झाला, कैद केला गेला, व शेवर्टी झालेल्या जखमेनें मरण पावला. त्याच्या मर- पार्ने मोंगलांच्या हृदयांतील एक मोठेंच शल्य निघालें. कारण तो मोठ्या कर्तबगारीचा पुरुष होता. येथें येवढे सांगण्यास नाहीं कीं याच वर्षी मोंगल स्वारांनीं जालंदर दुआबांतील काम्रा नांवाचा बलाढ्य किल्ला सर करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांस यश आले नाहीं. या किल्ल्यास वेढा घातला होता व अकबराच्या सैन्यानें आंतील फौजेस त्राहि त्राहि केलें होतें; इतक्यांत ज्याचा मुलताना- जवळ झालेला मृत्यु वर सांगितला, त्या साहसी पुरुषाच्या स्वारीमुळे हा वेढा सोडून त्या सैन्यास तिकडेस परत जावें लागलें. हा किल्ला अकबराचे मुलाच्या कारकीर्दीपर्यंत मोंगलांचे हात लागला नाहीं. अकबर गुजरार्थेतून परत जाण्यास निघाला, तेव्हां आपण हा . प्रदेश पूर्णपणे जिंकिला आहे, व आपण केलेल्या तेथील व्यवस्थेच्या •योगानें प्रजाजनांचा भरंवसा व प्रीति आपण जोडिली आहे, अशी