या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० अकबर बादशहा. त्याची समजूत झाली होती. परंतु, ज्यांनीं एकदां राज्यसुख अनुभवून अधिकार गाजविला आहे अशा पुरुषांस सत्तेची आवड किती असते, हें त्यानें पुर्रेर्से लक्षांत आणिलें नव्हतें. अकबर आग्र्यास पोहचून फार पदभ्रष्ट झालेल्या संस्थानिकांनीं दिवस झाले नाहींत तोंच गुजराथेंतील फौजफांटा गोळ करून लोकांस ताप देण्यास प्रारंभ केला. तेव्हां अकबराने या उद्भवलेल्या अरिष्टाचा अंकुर लहान आहे तोच ताबडतोब खुडून टाकण्याचा निश्चय करून ह्या कामाकरितां पश्चिम हिंदुस्थानावर दुसऱ्या मोहिमेची तयारी केली. प्रथम दळभार अघाडीस खाना केला व मागाहून आपण स्वतः सेप्टेंबर महिन्यांत एके दिवशी रविवारी सकाळीं एका चपळ सांडणीवर स्वार होऊन सैनिकांस मिळण्याकरितां मोठ्या त्वरेने निघाला. त्याने लगाम न आखडितां सत्तर मैलांची मजल मारून अजमीर व जयपूर यांच्या दरम्यान बहुतेक मध्यभाग असलेल्या तोडा नामक गांवीं मुक्काम केला. तिसरे दिवशीं सकाळीं तो अजमीरास दाखल झाला. तेथें मामुलीप्रमाणें त्यानें आपल्या गुरूच्या कबरस्थानाची पूजा वगैरे केली. नंतर सायंकाळी अश्वारूढ होऊन पुनः प्रवास सुरू केला. तो दीसाच्या वाटेवर पाली येथे आपल्या सैन्यास जाऊन मिळाला; नंतर त्याच्या सरदारांनी जमा केलेले घोडेस्वार पाटणाजवळ त्यास मिळाले. या ठिकाणीं पुढें चाल करण्याकरितां ते बादशहाची वाट पाहात बसले होते. अकबराचें सैन्य बंडखोर संस्थानिकांनों जमविलेल्या सैन्यापेक्षां लहान होते; परंतु तें शेलके योद्ध्यांचें होतें. त्वरा फार उपयोगी पडली. तो येऊन त्याने या प्रसंग केलेली दाखल झाला तरी देखील अकबर आग्र्याहून निघाल्याची बातमी बंडखोरांस कळली नव्हती. अकबर आग्र्याहून गुजरार्धेत नऊ दिवसांत दाखल होऊन बंडखोरांवर दत्त ह्मणून आला, त्या वेळीं ते अहमदाबादेनजीक आपल्या डेऱ्यांत बहुतेक घोरत पडले होते.