या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १११ ते वेळीं हिंदुस्थानांत ही पण धर्मयुद्धाचा प्रसार असून त्याची चहा होती हैं " तबक तई अकवारी" नामक ग्रंथ रचणाऱ्या इतिहासकारार्ने या प्रसंगीं घडलेली पुढील गोष्ट नमूद केली आहे तीवरून सिद्ध होतें. 66 'शत्रु बेसावध असतां त्यावर हत्यार उगारणें हें नामर्दाचें काम आहे. सबब ते जागे होईपर्यंत आपण थांबावे, अशी साऱ्या बादशाही सैन्याची मनोवृत्ति झाली;" तेव्हां करणेवाल्यास करणा वाजविण्याचा हुकूम झाला. इकडे बंडवाल्यांच्या प्रमुख संस्थानिकाच्या हेरांनीं चवदा दिवसांपूर्वी बादशहा आग्र्यास होता, अशी खबर दिली होती, ह्मणून आपल्या समोरील रिसाला बादशाही सैन्याचा नव्हे, कारण त्याबरोबर हत्ती नाहींत,' अशी अजून आपली खात्री असल्याचें त्यानें बोलून दाख- चिलें. तथापि तो लढाईच्या तयारीस लागला. अकबराने आपली धर्म- युद्धप्रीति अद्यापिही कायम ठेवून शत्रु तयार होईपर्यंत वाट पाहिली. ते सज्ज होतांच बादशाही सैन्य सपाट्याने नदीत उतरले. ती ओलां- डिल्यावर पलीकडील तीरावर सैन्याची रचना करून अकबर एखाद्या भयंकर वाघासारखा शत्रूवर तुटून पडला. वेळीं शत्रूवर आडवे बाजूने हल्ला केला. दुसऱ्या एका टोळीनें त्याच- हा दुहेरी मारा बंडखोरांस अनिवार्य होऊन त्यांचा पूर्णपर्णे पराभव झाला; त्यांचा नायक जखम लागून घायाळ झाला व त्याला कैद करून नेलें. नंतर एका तासानें बंडखोरांची दुसरी एक पांच हजार लोकांची टोळी समरांगणीं आली त्यांचाही बादशाही फौजेनें निकाल काविळा व त्यांचा पुढारी मारला गेला. लढाईंत, व पाठलाग झाला त्यांत, बंड- खोरांचे सुमारें २००० लोक खचीं पडले. अकबर पुढें अहमदा- बादेकडे वळला. तेथें तो पांच दिवस राहिला. हे दिवस त्याने आपल्या लष्करांतील कामगिरी बजाविलेल्या वीरांस इनामें वांटण्यांत व . काबीज केलेला प्रांत कायमचा सुरक्षित करण्यांत घाळविले. नंतर तो खेडा जिल्ह्यांतील महमुदाबाद येथें व तेथून सिरोहीस गेला.