या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ अकबर बादशहा. सिरोहीहून तो थेट अजमीरास जाऊन पोहचला. परमपूज्य व विख्यात गुरूच्या कबरेचें दर्शन घेतलें. तेथें त्यानें आपल्या अजमीराहून पुनः निघून अहोरात्र वाट चालून जयपुराजवळ सुमारें चवदा मैलांवर एक खेडें आहे, तेथें त्यानें राजा तोडरमल ह्याची गांठ घेऊन त्याच्या सल्ल्यानें गुजराथेंत धारा बसविण्यासंबंधानें व्यवस्था करण्याकरितां मुद्दाम मुक्काम केला. राजा तोडरमल हा अकबराच्या दरबारांत जे कांहीं काबील व दक्ष दरकदार होते, त्यांतला एक असून तो पुढें बाद- शाहाचा मुख्य दिवाण झाला. येथून अकबराची स्वारी फत्तेपुर - शिक्रीस गेली. याप्रमाणे ही ४३ दिवसांची मोहीम संपवून त्याने मोठ्या जयोत्सवानें त्या राजधानीत प्रवेश केला. सर्व हिंदुस्थान आपल्या एकछत्राखालीं आणण्याचा अकबराने केलेला निश्चय आतां बहुतेक तडीस गेला होता. राज्यपदारूढ होऊन अठरा वर्षांच्या आंत वायव्येकडील प्रांत, मध्य हिंदुस्थान, पंजाब, काबूल व पश्चिम हिंदुस्थान इतक्या प्रदेशांत त्याचा अंमल बसला होता. पूर्वेस त्याची सत्ता कर्मनाशेच्या तटापर्यंत फैलाविली होती. या नदीच्या पली- कडे बंगाल व बिहारचें स्वतंत्र राज्य होतें. त्यापासून मोंगलबादशा- हीस कांहीं प्रसंगोपात अपायाची भीति होती; तेव्हां कांहीं अकल्पित अडचण न आल्यास आपल्या राज्याचें एकोणिसावें वर्ष बंगाल व त्याच्या खालील प्रदेश जिंकण्याचे काम लावण्याचा अकबराने पुरतेपणीं निश्चय केला. तथापि, या मोहिमेस निघण्यापूर्वी आपल्या गुरुवर्याच्या कब- रेचें दर्शन घेण्याकरितां त्यानें अजमीरची आणखी एकदां यात्रा केली. अकबराच्या सैन्याच्या मोहिमी व त्यांचे विजय ह्याविषयींचा उल्लेख या भागांत बराच झाला आहे. परंतु, ह्या मोहिमी कोणत्या तत्वांवर केल्या जात त्याचें निरूपण अद्याप केलें नाहीं. लढाईचा खर्च लढाई - तून भागविणारे योद्धे आजपर्यंत पुष्कळ होऊन गेले, व सांप्रत इयात. असणाऱ्या पुरुषांच्या स्मरणांतही असे योद्धे असतील. मोंगलांचे