या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १ ला.

जी जुनी पद्धत, तीस अनुसरूनच होती. या छावण्यांचा एकमेकांश संबंध ह्मणून नसे. त्या सर्वांवर बादशहाची देखरेख मात्र असे. नवीन सर केलेले प्रांत बिनधोक करण्यास ही योजना उत्तम प्रकारची होती यांत शंका नाहीं. पण निरनिराळे प्रांतांत ऐक्यभाव स्थाप- याच्या कामी व त्यांतील प्रजाजनांचा एक सुसंमत समाज करण्याच्या कार्मी ही पद्धति अगर्दी अपुरी होती.
 पानिपतची दुसरी लढाई होण्यापूर्वीच अपघातानें हुमायुनाचा अंत झाला. यामुळें अकबर लहान १४ वर्षीचा मुलगा असतांच त्यास बाबराने मिळविलेले राज्यपद प्राप्त झालें. हा योग हिंदुस्थानाला सर्वतोपरी श्रेयस्कर झाला. हुमायून दीर्घकाळपर्यंत हिंदुस्थानांतून कालांत गेला होता. तो अनेक वर्षे दैवगतीशी झुंजत होता. पण याकालांत त्यानें कांहीं - नर्वे शहाणपण संपादिलें नाहीं व आपल्या जुन्या चुकीच्या समजुतीही तो विसरला नाहीं. त्याच्या मागून गादीवर बसलेला त्याचा मुलगा-अकबर अगर्दी अल्पवयी खरा; तथापि, इतक्यांतच साधारण मनुष्याच्या सर्व आयुष्य येऊं शकतील इतके दुर्घट प्रसंग व देवाचे फेरे त्यावर येऊन चुकले होते. अझूनपर्यंत तो कसोटीस लागलेला नव्हता. त्या काळीं अतिप्रबळ ह्मणून नावाजलेला सेनापति - बहिरामखान - हा त्याच्या जवळच होता. परंतु, या प्रबळ सेनापतीची राज्यकरण्याची शैली संकटांशी झगडतां झगडतां तयार झालेल्या हुमायुनच्या असंस्कृत पद्धतीप्रमाणेंच होती. पण, अकबर याचे अंग जे अनेक लोकोत्तर गुण होते त्यांत मोठा गुण हा होता कीं, जसें मोडण्याचें तसें जोडण्याचें ही पण बुद्धिसामर्थ्य त्याज- पाशीं होतें. त्यानें आपल्या अलौकिक सेनापतीस आपल्या नांवानें कांहीं वर्षं राज्यकारभार चालवूं दिला; व त्या अवकाशांत पूर्वी होऊन गेलेलीं राजघराणी अल्पायुषी कां झालीं आणि त्यांची मुळे देशांत कां रुझलीं नाहींत या गोष्टींचा त्यानें खोलवर विचार केला. त्याच्या योजना व बेत परिपक्क झाल्यावर त्यानें राजनेत्र आपल्या हातीं घेऊन, अशा पद्धती-