या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९४ अकबर बादशहा. व बिहार या प्रतांची या समयीं कशी काय स्थिति होती याचें थोड- क्यांत आपण निरीक्षण करूं या. वायव्येकडील प्रांतांत मोंगलबादशाही पुनः स्थापित झाली, ते समयीं बंगाल व बिहार येथील संयुक्त राज्यावर एक अफगाण राजा राज्य करीत होता. त्याने कांहीं वेळानें अकबराचें सार्वभौमत्व मान्य केले; परंतु ही मान्यता केवळ कागदावरचीच होती; व पुढेही ती तशीच राहिली. त्यानें कधीं करभार दिला नव्हता व अंकित ह्मणून तो कधीं बादशहाचे भेटीस आला नव्हता. अकबराची गुजराथेंतील दुसरी मोहीम चालली असतां हा राजा मरण पावला. त्याच्या दरवा- रांतील कांहीं थोड्या पण बलाढ्य सरदारांनीं त्याचा मुलगा व प्रत्यक्ष वारस यास ताबडतोब ठार करून, त्याचा धाकटा भाऊ दाऊदखान यास गादीवर बसविलें. दाऊदखान यास ख्यालीखुशालीशिवाय कसलीच दरकार नसे. असा राजा सिंहासनारूढ झाल्यामुळे, लोदी घराण्यांतील एक बलाढ्य अमीर बंडावा करण्यास उद्युक्त झाला. या अमीरार्ने आपले निशाण बिहार प्रांतांतील शहाबाद जिल्ह्यांतील रोहटासगडाच्या किल्ल्यांत उभारलें व आपण स्वतंत्र राजा अशी द्वाही फिरविली. यांच्यांत कसातरी तह झाला. पण दाऊदखानाने ह्या तहाचा व त्या लोदी अमीरानें ठेविलेल्या विश्वासाचा दुरुपयोग करून संधिसाधून त्या अमीरास पकडवून त्याचा वध करविला. बिहार प्रांतांतील अव्यवस्थित व्यवहार अकबराच्या ध्यानांत होता. सबब त्यानें जोनपूर येथील आपल्या सुभेदारास त्यावर नजर ठेवण्यास ताकीद करून प्रसंगानुरूप वागण्याची परवानगी दिली होती. दाऊदखानानें केलेल्या विश्वास- घाताची खबर ह्या सुभेदाराच्या कानी पडतांच त्याने कर्मनाशा नदी ओलांडिकी ; व मगल सैन्याश खुल्या समरांगणांत सामना करण्या छाती नसल्यामुळे दाउदखान तटबंदीनें मजबूत केल्ल्या पाटणा शहरी वा धरून बसला होता त्यावर स्वारी केली. अकबर गुजराथेच्या पुढे