या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. ११५ मोहिमेहून परत आल्यावर थोडे दिवसांनंतर बंगालची स्थिति अशा प्रकारची झाली होती. ही मोहीम प्रत्यक्ष आपल्या हुकमतीखाल चालावी अशी अकबराची इच्छा होऊन त्यानें आपल्या सरदारास असा हुकूम फरमाविला कीं, मी दाखल होईपावेतों लढाईसंबंधीं हालचाल तहकूब ठेवावी. नंतर तो नुक्तीच वर सांगितलेली अजमीरची यात्रा लौकर आटपून लगबगीनें सैन्यासह जलमार्गानें अलाहाबादेस गेला. तेथे मुक्काम न करितां तो तसाच पुढें जलमार्गानें प्रवास करून बनारस येथे दाखल झाला. तेथें तो त्रिरात्र राहिला. नंतर पुनः नौका- रोहण करून गंगा आणि गोमतीच्या संगमावर जाऊन पोहचला. तेथून आपल्या नायकाकडून खवर कळेपर्यंत जलमार्गानें वर जोनपुराकडे जाण्याचा त्यानें निश्चय केला. याप्रमाणें अकबर मार्गक्रमण करीत असतां त्याच्या नायबाकडून विनंतिपत्र दाखल झालें कीं, आपण होईल तितक्या त्वरेनें शत्रूवर चाल करण्यास निघून यावे. तेव्हां शहाजाद्यांना व समागमें असलेल्या बेगमांना परिवारासह जोनपुराला घेऊन जाण्याची नावाड्यांस ताकीद देऊन अकबर तत्क्षण मार्गे फिरला; व आपले सैनिक होते त्या ठिकाणी जाऊन पोहचला. त्यांना नावा दृष्टीआड होऊ न देतां नदी- तटानें कूच करण्याचा हुकूम देऊन तो चौसा शहरावर उतरला. ह्याच शहरी शेरखान यानें अकबराच्या बापाचा पराभव केल्याचें वाचकांस आठवत असेलच. या ठिकाणी अशी बातमी येऊन पोहोंचली र्की, शत्रूंनीं टण शहराबाहेर पडून छापा घातला व वेढा घालणाऱ्या सैनि- कांची पुष्कळ नासधूस केली. तेव्हां अकबर जलमार्गानेच मोठ्या नेटाने पुढें चाळला व सातवे दिवशी आपल्या सैन्यास जाऊन मिळाला. दुसरे दिवशीं त्यानें लढाईविषयीं विचार करण्यासाठी आपल्या सर- दारांचा दरबार भरविला. त्यांत त्यानें आपलें असें मत प्रदर्शित केलें र्की, पाटणाच्या किल्ल्यावर चाल करून जाण्यापूर्वी पाटणाचे समोर गंगा