या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ अकबर बादशहा. व गंडक या नद्यांच्या संगमावर असलेले हाजीपूर शहर काबीज करणें श्रेयस्कर आहे. हें मत ग्राह्य झाले व त्याप्रमाणे दुसरे दिवशीं हाजीपूर हस्तगत केलें गेलें. या विजयामुळे दाऊदखानाची पांचावर धारण बसली. व वेढा देणाऱ्या शत्रूंनीं प्रगट केलेल्या बाहुवीर्याने घाबरून जाऊन त्यानें त्याच दिवशीं रात्र पाटणांतून पोबारा केला. तो पुण- पुण नदीच्या मार्गानें ती गंगेस मिळते त्याचेजवळ फटवा शहरीं गेला. दुसरे दिवश प्रभातकाळीं जयोत्सवानें पाटणा शहरांत अकवरानें प्रवेश केला. परंतु दाऊदखानास पकडावा अशी त्याची उत्कट इच्छा होती ह्मणून तो तेथें कायतो चारच तास राहिला. नंतर आपल्या सैन्याचें अधिपत्य आपल्या नायबाकडे सोपवून तो शत्रूचा पाठलाग करण्याकरितां निवडक घोडेस्वारानिशीं निघाला. त्याने घोड्यावरूनच पुणपुण नदी पोहून जाऊन दाऊदखानाच्या अनुयायांस त्वरित गाठिलें; व एकामागून एक असे २५५ हत्ती काबीज करीत करीत दर्यापूर शहर गांठिलें. तेथें मुक्काम करून आपल्या लष्करांतील दोन विश्वासू सरदारांना त्याने पाठलाग पुढे चालू ठेवण्यास फरमाविलें. त्यानीं तो सातोप नेटाने चालविला. परंतु, दाऊदखान त्यांना झुकांडी देऊन दुसरीकडे निघून गेला हें स्पष्टपर्णे कळून आले ह्मणून परत आले. पाटणा येथें मिळालेल्या जयानें बिहार प्रांत अकबराचे हस्तगत झाला. नंतर, त्या प्रांतांतील राज्यव्यवस्थेची योजना करण्याकरितां त्याने दर्यापुरास सहा दिवस मुक्काम केला. वही मोहीम ज्या विजयी सरदाराने योजिली व यशस्वी केली त्यास त्याने त्या प्रत्ताचा सुभेदार नेमून त्याजकडे पुढील व्यवस्था सोपविली व आपण जोन- पुरास परत गेला. तेथें त्या प्रांताच्या राज्यकारभाराची चांगली पद्ध बसविण्याचे कामास लागून त्यानें ३३ दिवस मुक्काम केला. ह्या पद्धत्य- नुरूप जोनपूर, बनारस, चनार आणि जवळपासचे दुसरे महाल.. त्यान खास बादशाही जमाबंदीखालीं आणिले. व कर्मनाशेच्या