या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. ११७ दक्षिणेस नवीन काबीज केलेल्या प्रदेशाची व्यवस्था व जमाबंदी एका निराळ्या सुभेदाराकडे सोपविली. अशी व्यवस्था लाविल्यावर अकबर आग्र्यास जाण्याकरितां कान- पुराकडे गेला. या ठिकाणीं त्यानें चार दिवस मुक्काम केला. या अवधत, बंगाल्यांतील सेनापति मोंघीर, भागलपूर, गढी आणि तांडा- पासून गंगेच्या पैलतिरीं गौडपर्यंत सर्व ठाणीं एकामागून एक काबीज करून आणखी पुढे चाल करून जाण्याच्या तयारीत असल्याचें वर्त - मान येऊन पोहोंचलें. गौड ही हिंदु राजांच्या अमदानींत बंगालची जुनी व विख्यात राजधानी होती. ह्या सरदाराने आपला निश्चय मोठ्या उत्साहार्ने तडीस नेला. त्याने दाऊदखानाचा पिच्छा केवळ हात धुवून पाठीस लागून पुरविला; व बाझूरा मुक्काम त्याचा पराभव करून शेवटीं कटक येथें त्यास शरण यावयास लाविलें. हा राजा वश झाल्याने बंगालचा विजय पुरा कायम झाला असें मानितां येईल. नारनूल मुक्काम आपला अंमळ प्रजा- कानपूर येथें ही सुवार्ता कानी पडतांच अकबर यास परमावधीचा आनंद व अभिमान वाटला. बंगालच्या मोहिमेची खरोखर अखेर झाली असें मानून तो झपाट्याने दिल्लीस गेला. तेथें त्यानें कांहीं दिवस शिकार खेळण्यांत घालविले व नंतर तो आणखी एकदां अजमी- रच्या यात्रेस वाटेंत शिकार करीत करीत गेला. पंजाब व गुजराथचे सुभेदार यांच्या भेटी झाल्या. जनांस प्रिय होऊन आपल्या राज्यद्रुमाचीं मुळे रुझत चाललीं आहेत असें सुभेदारांच्या मुखानें धान वाटलें. या सुभेदारांश चार हितगुजाच्या गोष्टी झाल्यावर तो झपाट्यानें अजमीरास गेला व त्यानें आपल्या गुरूच्या कबरेचें दर्शन घेतले. जोधपूरच्या जंगलांत एका लहानशा मांडलिकानें बंडावा मांडिला होता, त्याचा बीमोड करवून नंतर फत्तेपूर - शिक्री येथील आपल्या आवडत्या राजमहालास तो परत आला. त्यांच्या अंतःकरणांत ऐकून त्यास फार समा-