या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. ११९ अपवादमूलक घडली ह्मणून झटलें ती ही की पश्चिम हिंदुस्थानांत घोर - दुष्काळ व रोगाची साथ उद्भवली; व या योगानें त्या प्रांतांत मोठा भयंकर कहर उडाला. धान्याची विलक्षण महर्गता झाली. चारा नस- -ल्यामुळे घोडे व गाईस झाडाच्या साली खाव्या लागल्या. हा दुष्काळ `व त्याबरोबरची रोगाची साथ एकसारखी सहा महिने चालू होती. पुढील सालीं, ह्मणजे इ० स० १९७५ या वर्षाचे आरंभी अकबराने दाऊदखानाचा पाठलाग करून ओरिसा प्रांत काबीज केला. मुघलमारी व जलेश्वर यांच्या दरम्यान भजूरा येथे या अफगाण राजाचा पराभव कसा झाला व त्याचा पाठलाग होऊन कटकच्या किल्ल्यास वेढा घातला असतां तो कसा शरण आला, याचें विवेचन पूर्वीच केलें आहे. त्याच्याशीं जो तह झाला त्यांत असें ठरलें होतें कीं, या राजानें अकबर बादशहाच्या वतीने व नांवानें ओरिसा प्रांतांत राज्यकारभार चालवावा. परंतु, दाऊदखान हा वचन दिल्याप्रमाणें आपले इमानास जागला नाहीं. अनुकूल अशी पहिली संधि सांपडतांच त्याने बंड केलें. पुढें दोन वर्षांनी एका मोठ्या लढाईत मोगल सरदारांनीं त्याचा पराभव केला. तेव्हां त्यास कैद करून त्याच्या राजद्रोहाबद्दल शिक्षा ह्मणून त्याचा शिरच्छेद रणभूमीवरच केला गेला. इतकें झालें तरी कांहीं वेळपावेतों बंगाल व ओरिसा या प्रांतांवरील बादशाही कारभान्यांना मोठ्या सावधगिरीने व शिताबीनेच वागावें लागलें. या सालीं ज्या अनेक विशेष गोष्टी घडल्या, त्यांत बादशहानें फत्ते- पूर शिक्री एथें इवातखाना अथवा शारदामंदिर या नांवाची एक भव्य व रमणीय इमारत बांधिली, ही एक होय. हैं स्थान विद्वान्, प्रज्ञावान् च गुणवान् अशा महाजनांच्या भेटीकरितां मुद्दाम तयार करविलें होतें. या मंदिरांत चार दिशेस चार मोठाले दिवाणखाने काढिले होते. पश्चिमेकडील दिवाणखाना सैयद अथवा पेगमबर: महमद याचे अनु यायांकरितां योजिला होता. दक्षिणेकडील दिवाणखाना अध्ययन