या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० अकबर बादशहा. करून ज्ञान संपादन केलेल्या पंडितांकरितां ठेविला होता. विवेक व शहाणपण यामुळें आणि ईश्वरी साक्षात्कार होत असल्यानें वंदनीय झालेल्या महात्म्यांकरितां उत्तरेकडील दिवाणखाना मुकरर केला होता. व पूर्वेकडील दिवाणखाना वर निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही एका वर्गाशीं समानशील असतील अशा अमीर उमरावांसाठीं राखून ठेविला होता. हें मंदिर पूर्ण झाल्यावर बादशहानें तेथें दर शुक्रवारी व इतर पुण्य दिवशी रात्रीं जाण्याचा परिपाठ ठेविला. एका दिवाणखान्यांतून दुसऱ्या दिवाणखान्यांत, ह्याप्रमार्णे जाऊन तेथील धर्मनिष्ठ पंडित व महात्मे ह्यांच्या समागमांत व त्यांशीं संभाषण करण्यांत तो ह्या रात्री घाळवी. अशा प्रसंगी या दिवाणखान्यांतील मंडळींनीं बादशहाच्या आदरसत्का- रास व औदार्यास आपणापैकी जो विशेष योग्य असेल त्यास सन्मानार्थ पुढें करावें असा बहुतेक सांप्रदाय असे. ह्या भेटीच्या वेळी अकबर त्यांची संभावना करी. व या मंदिरांतून कोणी रिक्तहस्त परत आला अर्से कधींच घडलें नाहीं. हे मंदिर या वर्षाचे अखेरीस तयार झालें होतें. पुढील साल (१९७६) अगदीं रिकामें गेलें ; परंतु त्याच्या पुढील झणजे इ० स० १५७७ हें साल पूर्वी उल्लेख केल्याप्रमार्णे दाऊद- खानार्ने ओरिसा प्रांतांत केलेल्या बंडाव्यामुळे ध्यानांत ठेवण्याजोगे झालें. ही मोहीम मोठ्या धामधुमीची व गडबडीची झाली; परंतु दाऊदखान व त्याचा चुलता समरांगणांत मरण पावल्यामुळे तिची फत्ते झाली. याच वर्षी राजपुतान्याकडूनही एक पेंच आला. या प्रदेशांतील संस्थानिकांपैकीं एकटा मेवाडचा राजा राणा उदेसिंग पार्ने मात्र, आपल्या नात्यांतील मुलींला अकबरानें मागणी घातली असतां, देण्याचें नाका- रून त्याच्याशीं शरीरसंबंध करण्याचें नाकारिलें होतें. आपण देव- कुलांत जन्मलो आहोंत तेव्हां यवनाशीं संबंध समजत असे. स्वतःचें पद स्थिर करण्याचा करणें तो अत्यंत प्रयत्न करीत असतां०