या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भांग ११ वा. १२१ असा शरीरसंबंध करणें त्यानें धिक्कारिलें होतें. पुढें, आपलें ज्याच्यार्शी हाडवैर असा जोधपूरचा राजा अकबराचे मनाप्रमार्णे वागला ह्मणून बादशहानें त्यास चार मोठ्या वसुलाचे महाल दिले व तो सधन झाला, ही गोष्ट डोळ्यासमोर घडली असतांही, त्याने ही शरीरसंबंधाची गोष्ट मान्य केली नाहीं. अकबराच्या सत्तेस न जुमानून त्याने आपला निश्चय कायम ठेवला. हा राणा इ० स० १५६८ साली आपल्या राजधानीस मुकला व राजपिपलाच्या जंगलांत पळून गेला; आणि सुमारें चार वर्षांनंतर इ० स० १५७२ या वर्षी मरण पावला. त्याचा मुलगा राणा प्रतापसिंग ह्याच्यांत त्याचे बापाचा संपूर्ण दुरा- "ग्रह व त्याचा आजा प्रसिद्ध राणा संग याच्याठायीं असलेले कित्येक अलौकिक गुणही उतरले होते. या राजपुत्राची स्थिति फार कष्टाची. होती. राजधानी नाहीं ; पैशाचें व इतर साधनांचें बळ नाहीं; व त्याचें इष्टमित्र व जातभाई ह्यांना, त्यानें मुसलमानांशीं शरीरसंबंध करण्याचॆं नाकारिलें हें जरी पसंत होर्ते, तरी ते आपल्या राण्यावर आलेल्या आपत्तीमुळे भग्नोत्साह झालेले होते; अशा अडचणींतही राणा प्रताप- सिंग यानें आपली गादी अरावली डोंगरांत कोंबलमीर येथें स्थापन करून बादशहाशीं पुनः संग्राम करण्याकरितां रजपुतांस सिद्ध करण्याची मोठ्या जारीनें खटपट सुरू केली. अकबर अजमीरास दरसालच्या यात्रेस गेला असतां त्याचे कार्नी ह्या मसलतीबद्दलची थोडी बहुत खबर पोहोंचली; तेव्हां त्यानें आपला अति विश्वासू, जातीचा रजपूत, व ज्याला गुजरार्धेत अकबराच्या बाजूला लढतांनां आपण पाहिलें आहे, तो' सेनानायक-जैपूरचा राणा मानसिंग यास ५००० घोडेस्वारांसमेत शत्रूवर एकदम चाल करण्याकरितां रवाना केलें. दोन्ही पक्षाकडील सैन्याची हुलडी घाट अथवा गोगंडा एथे १९७६ चे दिसेंबरांत गांठ पडली. लढाई झाली तींत राणा प्रतापसिंग याचा अगदीं बीमोड झाला व त्यानें अरावली डोंगरांत पळ काढला. तेव्हां त्याचा सर्व 16