या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ अकबर बादशहा. आधार नाहींसा करून त्यास जेरीस आणावे अशा इराद्यानें अकबरानें आपल्या सैन्याची एक टोळी डोंगरांत दवडिली व तीस हुकूम केला क राण्याचा पाठलाग करीत असतां त्याचा प्रांत उध्वस्त करून टाकावा. अकबर जातीनें मेवाडांत गेला व त्यानें तेथील राज्यकारभाराची शिस्त कावून दिली. नंतर तो माळव्याकडे निघाला. त्यानें पश्चिमेकडील सरहद्दीवर तळ देऊन बऱ्हाणपुराच्या अंमलाखालीं मोडणाऱ्या प्रेदशाचा कारभार व्यवस्थेशीर करून दिला. व गुजराथेंतील व्यवस्थेंत बरीचशी सुधारणा केली. या गोष्टींत १५७७ व ७८ ह्रीं वर्षे गेलीं. हे झाल्या- वर तो पंजाबाकडे जाण्यास निघाला. बादशहा पंजाबचा मार्ग आक्रमीत असतां एक गोष्ट घडून आली, ती सांप्रत हिंदुस्थानावर साम्राज्य करणाऱ्या लोकांस नमूद करण्यासारखी वाटेल. तो दिल्लीस पोहोंचला आणि त्या शहरापलीकडे एक मजल गेला, तेव्हां कोणीएक हाजी युरोपांत गेला होता त्यानें " तेथून आणि- लेला उत्तम फरमाशी माल व कपडा बादशहास दाखविण्यास आणिला. " यासंबंधी वर दिलेल्या अवतरणापेक्षां इतिहासकार जास्त माहिती देत नाहीं. तेव्हां हा माल व हैं कापड युरोपांतील कोणत्या भागांतून आले व तें पाहून बादशहाचा काय ग्रह झाला याची आपणांस कल्पनाच केली पाहिजे. अकबर पंजाबांत फार थोडा वेळ राहून दिल्लीस परत आला. ' नंतर तो अज़मीराची वारी करण्याकरितां गेला. तेथें एकच रात्र राहून लागलीच घोड्यावर स्वार होऊन समागमें कायते नऊ असामी घेऊन दररोज शंभर मैकांची मजल मारीत तो तिसरे दिवशीं संध्याकाळी फत्ते- पूर शिक्री येथे दाखल झाला. पुढील वर्ष, ह्मणजे १५८० है साल मोठें महत्वाचें ह्मणावयाचें. कारण त्या वर्षी मोंगलांचें राज्य भरभराटीच्या शिखरास जाऊन पोर्होचलें. बंगाल प्रांतांत शांतता होती इतकेंच नाहीं तर बादशाही खजीन्यांत तेथून पैशाची भर होत होती. मेवाडच्या राण्याचा पाठलाग