या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अकबर बादशहा.

वर आपल्या घराण्याची सत्ता बसविली कीं, त्याची पद्धति चालू होती तोपर्यंत ती सत्ता उत्कर्षावस्थेत राहिली. त्या पद्धतींतील तत्वांपैकीं मुख्य तवें - धर्मस्वातंत्र्य व प्रजानुकूलता-यांचा लय होतांच त्याचे घरा- ण्याचा -हास होण्यास प्रारंभ झाला.
 एथवर दिलेल्या संक्षिप्त हकीगतीवरून वाचकांस स्पष्टपणे कळून आलें असेल की, एका अर्थी बावर हा हिंदुस्थानांत मोंगल घराण्याचा संस्थापक होऊन गेला खरा; परंतु त्यानें आपल्या नंतर येणाऱ्या बाद: शहांला आठवण ठेवली, ती फक्त लढाया मारणाऱ्या विजयी योद्ध्याचीच. निदान इतके खास की, हुमायुनाचे अंतःकरणांत एवढीच कल्पना उत- रली होती व त्याने तिच्या जोडीस दुसरी कोणतीही कल्पना न आणि- . ल्यामुळे बापानें कमाविलेलें सारें राज्य गमाविलें.त्यांपैकीं कांहीं भाग त्यार्ने अखेरीस परत मिळविला हें खरें; परंतु तो केवळ लढाई जिंकून मिळविला. त्याच्या नातवानें मात्र या राज्यरूपी वृक्षाचीं मुळे देशांत खोलवर जातील असें केलें. तीं तेथें रुझलीं व त्यांचा विशाल व जोम- दार वृक्ष होऊन, त्यास पराभूत केलेल्या नानाविध प्रजाजनांच्या सुख- समाधानरूपी सुरस फळांचा मातबर बार आला.
 पुढील पृष्ठांत जे मुख्य सिद्धांत सिद्ध केले आहेत त्यांचा हा एथवर उपोद्घात केला. या पुस्तकाचे स्वाभाविकपर्णे तीन भाग होण्याजोगे आहेत असें दिसतें. यापैकी पहिल्या भागांत हिंदुस्थानावर स्वारी करून विजय संपादण्याची व तेथें राज्य स्थापण्याची कल्पना प्रौढतेस आण- णाऱ्या बाबरचा वृत्तांत दिलेला आहे. तो एक मोठा अलौकिक पुरुष होऊन गेला; व तो कोणत्याही युगांत जन्मला असता तरी अलौकिक च झाला असता. तो आपले ४९ वे वर्षी भर ज्वानींत मरण पावला. त्यानें आपल्या मार्गे स्वतः लिहिलेली स्वतःची बखर ठेविली आहे. तिच्या वाचनापासून ह्या एकोणिसाव्या शतकाचे अखेरीस देखील मनोरंजन व लाभ होण्याजोगा आहे. यांच्या वृत्तांताला बराचसा