या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. '१२३ अद्यापही सुरूच होता. परंतु याशिवाय दुसऱ्या कोणत्याही हिंदुस्था- नाच्या भागांत शस्त्रप्रहारांचा ध्वनि ऐकूं येत नव्हता. ह्मणत, त्या बंद केल्या. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांवर बरोबरीचे राजे सत्ता चालवीत 'होते, अशा वेळी एका प्रांतांतून दुसऱ्या प्रांतांत जाणाऱ्या मालावर बस- विलेल्या जकाती योग्य होत्या; परंतु ते प्रांत आतां एकछत्राखालीं आल्यामुळे, त्यांची प्रवृत्ति फक्त पूर्वीचा बेबनाव शाश्वत ठेवण्याची होणार, ही गोष्ट अकबराच्या ध्यानांत, प्रवास करीत असतां, येऊन चुकली होती. णून १९८१ सालच्या प्रारंभीं त्यानें ह्या सर्व जकाती, ज्यांस टमधा, ह्या हुकुमा बरोबरच जिझिया नांवाचा कर रद्द केल्याचें फरमाविलें. हा कर हिंदुस्थानावर सत्ता चालवि णा-या पूर्वीच्या अफगाण राजांनीं, महमुदीय पंथाचे नसतील अशा सर्व प्रजाजनांवर दर माणशी बसविला होता. विचार - स्वातंत्र्याची सर्वांस मुभा असावी व आपल्या प्रजेपैकी प्रत्येकाने आपापल्या संप्रदायानुरूप व 'मतानुरूप ईश्वरोपासना करावी अशी अकबर बादशहाची उदार बुद्धि होती. हें तत्व त्यानें अखेरपर्यंत कायम राखिलें बंगाल प्रांतांत कित्येक असंतोषी अमीर उमरावांनी बंडावा केला हीच या सालाची राजकीय दृष्टीनें अति महत्वाची गोष्ट. परंतु या मंडळींत जूट नव्हती, सबब त्यांचा पराभव होऊन त्यांची दाणादाण केली गेली. महमद हकीम तिची पिछेहाट पुढील, झणजे १९८२ साल अकबराचा भाऊ मिरझा यानें काबुलाहून हिंदुस्थानावर स्वारी केली. करण्याकरितां अकबर सैन्यासह पंजाबावर चाल करून गेला. तो पानि- पतास दाखल होण्यापूर्वीच त्याचा बंडखोर भाऊ लाहोराच्या अगद जवळ येऊन पोहचला होता. अकबर चालून येत आहे अशी खबर महमद हकीम मिरझा यास समजतांच आपली मोहीम फसणार अशी त्याची खात्री झाली; व त्याने लाहोरापासूनच माघार घेतली, आणि काबूलचा रस्ता सुधारला. त्याच्या मागोमाग सरहिंद, कालानार, व