या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ अकबर बादशहा. रोटास या मार्गानें जाऊन सांप्रत कटक आहे त्या स्थळीं अकबरानें सिंधु- नद ओलांडला. या समयीं तेथें एक किल्ला बांधण्याचा त्यानें हुकूम केला. झाला. अकबर पेशावरापर्यंत चाल करून गेला. तेथून त्याने का काबीज करण्याकरितां आपल्या सैन्यांतून एक टोळी पुढे दवडिला व तिचें सेनाधिपत्य आपला मुलगा शहाजादा मुराद याजकडे सोपविलें. शहाजादा मुराद हा तरुण, उंच, व सडपातळ असा असून त्याचा वर्ण काळवट असा होता. त्याला दारू पिण्याचें व्यसन जबर लागलें होतें. व तिच्या पायच त्याचा व त्याचा भाऊ शहाजादा दानियल याचा अंत त्याने झपाट्यानॆ मजला मारून आपल्या चुलत्याच्या सैन्यास खुद्द काबूल येथें गांठले व त्याचा अगदीं पराभव केला. शहाजाद्यास कुमक करण्याकरितां अकबर त्याच्या मागून सैन्यासह गेला व त्याचे नंतर तीनच दिवसांनी कावुलास दाखल झाला. तेथें तो तीन आठवडे राहिला. त्यानें आपल्या भाव चे अपराध पोटांत घातले व काबुलाचा राज्यकारभार पुनः त्यास दिला. नंतर खैबर घाटानें तो लाहोरास परत गेला. व पंजाब प्रांतांतील राज्यकारभार सुव्यवस्थित करून मग दिल्लीवरून फत्तेपूर शिक्री येथें खाना झाला. इतिहासकारानें असें लिहिलें आहे कीं ' या प्रसंगीं अकबर बरेच दिवस फत्तेपूर शिक्री येथें राहिला व त्यानें आपला काळ न्याय इनसाफ़ करण्यांत, दानधर्म देण्यांत, व इतर सार्वजनिक कामांची व्यवस्था लावण्यांत घालविला. ?.. पुढच्या सालीं तो सर्व वर्षभर तेथेंच राहिला असें दिसतें. बंगाल्यां- तील बंडावा अजून ही धुमसत होता. परंतु या प्रांतांत कारभारावर फार काबील सरदार नियुक्त केलेले होते. ते सर्व कच्ची हकीकत बादशहास हमेशा कळवीत आणि तोही नेहमी त्यांना आपले हुकूम पाठवीत असे. हा बंडावा कांहीं मोठासा नव्हता; परंतु त्याच्यापासून त्रास होई व बसूल करण्याचे कामांत बरीच अडचण येई.