या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १२५ इ० स० १५८४ च्या प्रारंभीं अकबर फत्तेपूर शिक्रीसच होता. या सालच्या घडून आलेल्या प्रमुख गोष्टी झटल्या ह्मणजे:- बंगाल्यां- तील दंगाधोपा मोडून तेथें केलेली स्वस्थता ; गुजरार्धेतील बंडाचा उद्भव व बीमोड, अशीरगड व बऱ्हाणपूर येथील सुभेदारांनी केलेला दंगा; दक्षिर्णेत उत्पन्न झालेल्या धामधुमी व त्या वेळीं काबुलावर अंमल चालविणारा अकबराचा बंधु ह्याचा मृत्यु हीं बंडे मोडलीं गेलीं व काबु- लावर एका नवीन सुभेदाराची रवानगी झाली. साळ अखेरीस बाद- शाहत पुनः चोहोंकडे आबादानी झाली. बादशहाच्या अति करारी व पक्कया दोस्तांपैकीं जयपुराचा राजा राणा भगवानदास हा होता. त्याने फक्त स्वतःच समरांगणांत मोठमोठ्या पराक्रमांचीं कामें केलीं असें नाहीं ; तर त्याचा पुतण्या मानसिंग यानेही अकबराच्या सैन्यांत पहिल्या प्रतीचे अधिपत्य मिळविलें होतें. सांप्रत हा राजपुत्र पंजाबचा सुभेदार होता. शहानें या वेळीं युवराज सलीम, जो पुढे त्याच्याकरितां एक वधू पसंत केली. याच घराण्यांतून अकबर बाद- येथे मोठ्या थाटामाटाचा व महोत्सवाचा जहानगीर बादशहा झाला, हा लग्नसमारंभ फत्तेपूर शिक्री झाला. अकबराच्या राज- वट्यापर्यंत महमुदीय पंथांतील राजाशी सोयरीक करण्याच्या कल्पनेचा रजपूत राजे मोठ्या तिरस्कारानें 'अव्हेर करीत. परंतु राष्ट्रांत एकी करणें, व धर्मभेदामुळें व जातिभेदामुळे मनुष्यांत फरक पडत नाहीं, हे मूळतत्त्व व्यवहारांत आणणे ही तर अकबराची मोठी इच्छा होती. परंतु या बाबतींत लोकांचें व त्यांत विशेर्पेकरून रजपुतांचे होऊन बसलेले अनेक ग्रह त्याला जिंकावे लागले. व अखेरपर्यंत मेवाडचा राजा राणा उदेसिंग याचा दुराग्रह त्यास काढून टाकितां आला नाहीं. बाकीच्यांनीं इतका हट्ट धरला नाहीं. अकबर हा हिंदुस्थानांत हाकालपर्यंत अश्रुतपूर्व अशीं तत्वें स्थापीत आहे हे त्यांनी पूर्णपणे ओळखिलें त्याच्या दृष्टीनें गुण ह्मणजे गुण, मग तो हिंदुराजांत