या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.१२६ अकबर बादशहा. असो वा युझबेक मुसलमानांत असो. गुणी मनुष्याची जात व धर्म हीं त्यास मोठ्या अधिकारांच्या जागी नेमणूक होण्याच्या व मान्य- तेला चढण्याच्या आड तो येऊं देत नसे. ह्मणून आपापल्या वंशपरंपरागत आलेल्या राज्यांत स्वतंत्रपणे सत्ता चालविली असतां आपणांस जी मान्यता प्राप्त झाली असती त्यापेक्षां फार जास्त व दूरवर पसरलेली अशी या मुसलमानी बादशाहींत मान्यता आपण भोगीत आहों असें राणा भगवानदास, मानसिंग, राजा तोडरमल इत्यादि पुरुषांस कळून आलें. बादशाही प्रांतावर अंमल चालवीत व बादशाही सैन्यावर सेनापत्य करीत, व बादशहाच्या अगदीं गुप्त सल्लामसलतींत त्यांचा प्रवेश असे. प्राचीन दुराग्रह व कलह समूळ नाहींसे करावेत व आपल्या चक्रवर्तित्वास अनुकूळ होणाऱ्या संस्थानिकांच्या वास्तविक सत्तेस कमीपणा न येऊ देतां आजपर्यंतचे त्यांमधील भेदाभेद मोडून सर्व राष्ट्राचे एक जीवित्व करावें व कोणाच्या वैभवास व इभ्रतीस धक्का बसू न देतां आपलें सार्वभौमत्व स्थापावे हा अकबराचा मुख्य उद्देश होता. हा हेतु साधण्याकरितां अकबराने ज्या उपायांची योजना केली त्यांपैकीं एक आपण स्वतः व आपल्या घराण्यांतील इतर पुरुषांनीं एतदे- शीय राजांच्या मुलींशीं विवाह संबंध करावा हा होता. बरोबरीचें नातें स्थापित करणारें लग्नसंबंधासारखे दुसरें साधन नाहीं हें त्यास पूर्णपर्णे ठाऊक होतें. मादीस वारस असलेल्या शहाजाद्याशी किंवा केव्हां केव्हां तर खुद्द तक्तावर विराजमान असलेल्या बादशहाशीं सोयरे संबंध असणें ह्मणजे आपली सत्ता व मानमरातब निर्धोक करणें होय, हैं रजपूत राजांना कळून आल्याशिवाय राहिलेच नसावें. अकबराच्या राजवट्यापूर्वी हिंदुस्थान देशाची स्थिति कोणत्या प्रकारची होती, मागील पांच शतकांत मुसलमान राजांनीं मिळविलेले विजय देशांत .. सुसंबंध न स्थापितां तंटा व बखेडा आणण्यास कसे कारणीभूत झाले, "