या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १२७ आणि हा बादशहा अल्पवयस्क, अनुभव नसलेला आणि कसोटीस न लागलेला असा असतां गादीवर येऊन त्यानें जो जो प्रांत जिंकिला त्या त्या प्रांतांत सुव्यवस्था व सुरळीत कारभार आणि न्याय व धर्मस्वातंत्र्य हीं स्थापित केलीं, किंबहुना या तत्वांचा प्रसार करावा याच उद्देशानें त्यानें देश मिळविले, जातिभेदामुळे किंवा धर्मभेदामुळे त्यानें मनुष्यांत ह्मणून कर्धी फरक कसा तो मानिला नाहीं, या गोष्टींचा विचार मनांत येऊन, ईश्वरी अवतारावर साहजिक विश्वास ठेवणाऱ्या या रजपूतांस अकबराचे आंगीं कांहीतरी अमानुष व परमकृपावंत ईश्वरी अंशाचे गुण असावेत. असें खचित वाटलें असावें. त्याने दिलेले धर्मस्वातंत्र्य इतके अनिर्बंध असे, त्याने ठेविलेला विश्वास इतका दृढ असे, आणि त्याने अंमलांत आणलेली तत्वें इतकीं व्यापक व उदार बुद्धीचीं होतीं कीं हे लोक आपले जातिमूलक, धर्म- मूलक, व परिस्थितिमूलक दुराग्रह विसरले; व त्याच्या मोहास वश झाले. हिंदु नाहींत ते सर्व अपवित्र व अमंगल असा त्यांचा फार दिवसांचा ग्रह होता. पण नवीन राज्यपद्धतीचा पाया ह्मणजे सर्वांचें संमीलन, हॅ तत्व त्यांनी मान्य केल्यावर त्यास प्रतिकूळ असलेला हा ग्रह मोबदला ह्मणून सोडून देण्यास जेव्हां अकबरानें त्यांस सांगि- तलें, तेव्हां एक खेरीज करून त्या सर्वांनीं तें ह्मणर्णे कबूल केलें. संमीलनाचें जें मोठें तत्व त्यास अपवाद खपावयाचा नाहीं, व अनार्यांशीं लग्नव्यवहार निषिद्ध ह्मणून सांगणारा आपल्या संकुचित धर्मपंथांतील जो एक भाग त्याचा त्याग करून वागलें असतां आपल्या देशास शांतता आणि वैभव व स्वतःस मान व प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या राज्य- पद्धती अधिकच बळकटी आल्यावांचून राहणार नाहीं, हें त्यांच्या पूर्णपर्णे ध्यानांत आलें. अकबर गादीवर बसल्याका तीस वर्षे लोटलीं. एकतिसाव्या वर्षास • प्रारंभ झाला, तेव्हां त्याचा बंधु मरण पावला व युझबेक लोकांनीं सर-