या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ अकबर बादशहा. या ठिकाणाहून राणा भगवान - देऊन त्यास काश्मीर जिंकण्या- हद्दीवरील बदकशान प्रांत व्यापून टाकून कावुलावर स्वारी करण्याची दहशत घातली आहे अशी खबर येऊन पोहोंचली. हा प्रसंग मोठ्या धोक्याचा आहे व या समयास आपण तेथें जातीने गेल्यावांचून गत्यंतर नाहीं असें त्यास वाटलें. त्याप्रमाणे नोवेंबरमध्ये सैन्यासह तो पंजाबाला नाण्यास निघाला. दिसेंबर अखेर तो सतलज नदीपर्यंत जाऊन पोहचला व तेथून नीट रावळपिंडीस चालून गेला. काबूलचे प्रक रणाचा झोंक आपल्या हितास अनूकूल होण्याजोगा आहे असें या ठिकाणी त्यास समजल्यावरून आपल्या नवीन बांधलेल्या अटकेच्या किल्ल्याकडे त्यानें मोर्चा फिरविला. दासाचे बरोबर सैन्याची एक टोळी करितां खाना केलें, दुसरी एक टोळी बलूची लोकांचें शासन करण्या- करितां पाठविली व तिसरी टोळी स्वातवर स्वारी करण्याकरितां दव- डिली. यांपैकीं शेवठच्या मोहिमेवर मोठा कहर गुदरला. युसफ लोकांनीं मोंगल सैनिकांनीं केलेला पहिला हल्ला हटवून लावला इत- केच नाहीं तर मागाहून अकबराने आपला अत्यंत प्रीतींतला सरदार- राजाबिरबल - ह्याच्या समागमें पाठविलेली कुमक हल्ला करणारांना येऊन मिळाल्यावर देखील मोंगलांस त्यांनीं हांकून लाविलें. त्या युद्धांत बादशहाचे ८००० लोक नाश पावले; त्यांस राजा बिरबलही होता. हा बिरबल एक ब्राह्मण सरदार होता. तो कवि असून गंधर्वविर्धेत निपुण होता. त्याचें शील व दातृत्व हीं प्रख्यात होत. त्याच्या नकला, लहान लहान पद्ये व विनोदपर चुटके हिंदुस्थानांत अद्याप सर्वतोमुख आहेत. येथें मोंगलाचा जसा भयंकर पराभव झाला तसा पूर्वी कधींच झाला नव्हता. या पराजयाने गेलेली कीर्ति पुनः मिळविण्यासाठीं बादशाहानें आपला प्रमुख सेनाध्यक्ष राजा तोडर मल यास जयपूरचा राजा राणा मानसिंग बरोबर देऊन खाना केलें. उभयतां सेनापतींनीं मोठ्या सावधगिरीने डावपेंच चालविले. ते पुढे सरसावत, •