या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १२९ ते तटबंदी करून मोठ्या काळजीनें. अखेरीस त्यांनी खैबर खिंडीत युप्तफझै ोकांचा पराभव करून त्यांस अगदीं जेरीस आणिलें. इकडे काश्मीरांत पाठविलेल्या मोहिमेची अवस्था बहुतेक याच्या सार- खीच झाली होती. या स्वारीवरील सेनापति शुक्रिया नांवाच्या खिंडीत दाखल झाले व तेथें त्यांस समजून आलें कीं त्या प्रांतावर सत्ता चालविणान्या 'मुसलमान सुभेदाराने त्यांची नाकेबंदी केली आहे. कित्येक दिवस ते अन्न सामुग्रीची वाट पहात बसले. पण इतक्यांत पर्जन्य व बर्फ पडण्यास सुरवात झाली. नंतर पुढे सरसावण्यास निघण्यापूर्वीच युझफझै कोकांनीं मोंगल सैन्याचा पाडाव केल्याची बातमी येऊन थडकली. तिच्या योगानें जी कांहीं थोडी बहुत हिंमत उरली होती तीही खचली. ह्मणून त्यांनी घाई करून काश्मीरच्या राजानें अकबराचे नांवाचें सामंत व्हावें या अटीवर त्याच्याशी तह केला. नंतर ते बादशहाकडे परत गेले. या मोहिमेतील सरदारांनी साहस मुळींच दाखविलें नाहीं. अकबराने त्यांचें स्वागत केलें नाहीं व त्यांना दरबारांत येण्याची मनाई केली. परंतु त्याचे चित्तवृत्तीत दीर्घद्वेषास स्थानच नव्हते. त्यानें त्यांस लवकरच क्षमा केली. या तिन्ही स्वान्यांपैकीं बलूची लोकांवर पाठविलेली मोहीम मात्र लवकरच विजयी झाली. हे नेटदार योद्धे प्रतिरोध न करितां मोंगल बादशहास वश झाले. राजा तोडरमल व मानसिंग यांच्या प्रयत्नांनी खैबर खिंड खुली होतांच अकबराने यापैकी दुसऱ्या राजास, ह्मणजे जैपूरच्या राजाचा पुतण्या व वारस यास काबुलांत सुभेदार नेमिर्के ; व बरोबर पुरेसें सैन्य देऊन त्याची तिकडेस रवानगी केली. इकडे यु- फझै लोकांच्या प्रदेशांत राजा मानसिंगाचे जागीं व पेशावरास दुसरे लढाऊ लोक पाठवून तो प्रांत बळकट केला; व अकबर स्वतः लाहो- स परत गेला. येथून त्यानें काश्मीरावर दुसरी मोहीम रवाना केली. हैं सैन्य तेथील सीमेजवळ पोहचतें इतक्यांत, ह्मणजे १९८७ च्या 17