या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० अकबर बादशहा. प्रीष्म ऋतूंत श्रीनगर येथें सत्ता चालविणाऱ्या राजाविरुद्ध तेथील रहिवाशांनी बंड केलें. या योगानें बादशाही सैन्यास या प्रांतांत रिघाव करण्यास व तो काबीज करण्यास बिलकूल अडचण पडकी नाहीं. तो सहजच मोंगल बादशाहीस जोडला गेला. हा प्रदेश अकबराच्या वार- सांच्या राजवट्यांत ग्रीष्म ऋतूंत हिंदुस्थानांतील मोंगल बादशहांचे निवासस्थान झालें. खैबर खिंडीच्या तोंडाशीं जमरुड येथें दाखल होण्याकरितां राजा मानसिंग यास डोंगरांतील रहिवाशांशी आणखी एक लढाई करून जिंकावी लागली. अखेरीस तो काबुला जाऊन पोहोंचला. आणि तेथें त्यानें स्थायिक अशी राज्यव्यवस्था स्थापिकी. परंतु रजपूत राजाचा अंमल आह्माला पसंत नाहीं असें काबुली लोकांनी व इतर जातींतील प्रमुख पुरुषांनी अकबराकडे गा-हर्णे केलें ; त्यावरून बादशहानें राजा मानसिंग यास सारख्याच हुद्यावर बदलून बंगाल्यांत पाठविलें. त्या प्रांतांत विशेषतः या प्रसंगी अशाच कर्तबगारीच्या कडव्या अंमलदाराची अवश्यकता होती. त्याचे जागीं काबुलांत एका मुसलमान सुभेदाराची योजना केली आणि आपण काबूल पाह- यास लवकरच येऊ असें अकबराने ह्याच वेळेस जाहीर केलें. अकबराने प्रथमतः इ० स० १९८८ त सिंध प्रांत आपलासा केला. नंतर पुढच्या वर्षी वसंतांत तो काश्मीरास जाण्यास निघाला. भीमबार येथे दाखल झाल्यावर त्यानें आपल्या जनानखान्यांतील बेगमांना शहा- जादा मुराद याच्या समेत त्या ठिकाणीं ठेविलें व आपण घोड्यावर स्वारी करून ताबडतोब श्रीनगरास कूच केलें. पासची स्थळे पाहत तो तेथेंच राहिला. आपला जनानखाना रोटास येथें पाठविला. मार्गांत तो त्यास अटक येथे येऊन मिळाला. पावसाळा लागेपर्यंत जवळ- पावसाळ्याच्या तोंडाशीं त्यानें पुढें काबुळास जात असतां मार्गातील डोंगरांवरील कोकांनीं प्रतिबंध करण्याचे सोडून दिल्यामुळें काबूल शहरास जाण्याचे सर्व मार्ग खुले होते, ह्मणून त्यानें अटक येथे सिंधुनद ओलांडला. ०