या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ अकबर बादशहा. प्रांतांत विजय मिळेल अशी त्यानें अगोदरच अटकळ बांधिली होती. आपले बहुतेक सैन्य भीमबाराकडे खाना करून देऊन तो स्वतः चिनाब नदीचे कांठीं शिकार करीत होता. तेव्हां सिंध प्रांतांत संपूर्ण विजय मिळाला अशी बातमी येऊन पोहोंचतांच तो आपल्या मुख्य सैन्यास मिळण्याकरितां निघाला. मार्गांत त्यास अशी खबर समजली कीं, दारुण विरोध असतांही बिनीच्या सैन्याने एका खिंडींत रिघाव केळा. या गोष्टीनें लढाईचा निकाल लाविला. कारण, बंडखोर शिपायांस आपल्या पुढाऱ्याचा राग येऊन त्यांनीं रात्रौ त्याजवर हल्ला केला, त्यास ठार मारिलें, व त्याचे शीर कापून तें अकबराकडे पाठविलें. या पुरुषाबरोबर विरोधही नाहींसा झाला. तेव्हां अकबर घोड्यावरून श्रीनगरास चालता झाला. तेथें आठ दिवस राहून त्यानें त्या प्रांताचा बंदोबस्त केला. नंतर बरमुला खिंडीच्या मार्गानें तो रोटास येथे गेला व तेथून लाहोराकडे वळला. येथें असतां बंगाल्याचा सुभेदार राणा मानसिंग यानें ओरिसा प्रांत निखालस खालसा करून वादशाही मुलखास जोड- ल्याची खबर अकबरास समजली.. या राण्यानें ओरिसा प्रांतांत काबीज केलेले १२० हत्ती बादशहास नजर ह्मणून पाठवून दिले होते.. पुढील स्वारी विंध्याचलाच्या दक्षिणेकडील प्रांत जो दक्षिण देश या नांवानें प्रख्यात आहे, तो बादशाही अंमलाखालीं आणण्याच्या योजनेस प्रारंभ झाला. हा उद्योग ८ वर्षे चालू राहिला एकंदरींत ह्या उद्योगास यशच आले. दौलताबाद, खेरवा, नाशीक, अशीरगड व अहमदनगर हीं बलाढ्य ठिकाणें पुष्कळ दिवस वेढा सोसून शेवटीं बादशाही सैन्यास वश झाली. व अहमदनगराखालीं मोडणारा प्रांत इ० स० १६३७ पर्यंत जरी पूर्णपणे काबीज झाला नाहीं तथापि या वेळीं अकबरानें जो रबाब बसविला त्याचे योगानें मोंगलास प्राप्त झालेले वर्चस्व निदान एक शतकपर्यंत तरी कायम राहिलें. . या दक्षिण हिंदुस्थानांतील मोहिमेंत तीन लक्षांत ठेवण्या जोग्या