या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग १ ला.


भाग देण्याचें आह्माला विशेष जरूर वाटलें. कारण, आजाची धमक आणि उत्साह व त्याची नैसर्गिक उदार वृत्ति, हीं त्याच्या नातवाच्या- अकबराच्या—कृतींत वाचकांना पदोपदीं नजरेस आल्यावांचून राहणार नाहींत. हुमायुनाची हकीगत खरोखर या पहिल्या भागांतच समावेश करण्यासारखी आहे. तिच्यापैकीं जेवढी ह्मणून, त्याचा म्हास ज्यांमुळे झाला तीं कारणें स्पष्टपर्णे कळण्यास व त्यानें हिंदुस्थानांतून पळ काढला असतां मार्गात सिंध देशांत जन्मलेल्या आमच्या चरित्रनायकाचे बाळपणाचे दिवस कसे गेले हे समजण्यास अवश्य, तेवढींच येथें दिल्लीं आहेत.
 बाकी राहिलेल्या दोन भागांत अकबराचे इतिवृत्त दिले आहे. तथापि एथें देखील आह्मी मुख्य विषयाचे दोन विभाग केले आहेत. यापैक पहिल्या विभागांत तत्कालीन मुसलमान इतिहासकारांच्या ग्रंथांचा आधार घेऊन अकबराच्या राजवट्यांत घडलेल्या राजकीय गोष्टी सांगि- तल्या आहेत. शेवटच्या भागांत तो पुरुष कसा होता याचे चित्र दिलें आहे. त्याने राज्य कसें केलें, तें सुयंत्रित चालण्यासाठीं त्यानें कोण- कोणच्या नवीन संस्था स्थापिल्या व नवीन व्यवस्था केल्या, इंग्रज सरका- रांनीं देखील . पुष्कळ अंशांनी चालू ठेविलेली राज्यपद्धति त्याने कशी रचिली, पांच शतकांचे तंटे व वाद आणि अनादि काळापासून चालत आलेके दुराग्रह त्यार्ने कसे मोडले व शांत केले, यार्चे वर्णन या भागांत, आईन-ए-अकबरीच्या व इतर ग्रंथांच्या आधारे करण्याचा मी यथाशक्ति प्रयत्न केला आहे. आपल्या मतांहून ज्यांचीं मतें भिन्न आहेत अशांचा छळवाद करावा अर्से शिकविणाऱ्या मुसलमानी धर्मात लहानाचा मोठा झाला असतां ही ज्यानें आपल्या विशाल बुद्धीस स्वैरगति दिली, व आपल्या बुद्धिवैभवानुरूप ज्यानें आपके वर्तन ही उदार ठेविलें, असा हा अकबर, पति, पिता, व जनसमाजांतील एक कर्ता सवर्ता पुरुष ह्या दृष्टीनें कसा होता, याचें ही वर्णन केलें आहे.या सर्व पुस्तकांत हाच