या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १३३ गोष्टी घडून आल्याः- पहिली गोष्ट ही कीं या मुलुखांत विजय संपाद- ण्याकरितां हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांतून स्वतंत्रपणे मदत कर- ण्यासाठी जे सेनापति पाठविले त्यांच्यांत मोठेच कलह उत्पन्न झाले, ते इतके कीं, त्यांच्या शमनार्थ बादशहास आग्र्याहून प्रथमतः आपला जिवलग मित्र अबुलफझल यास पाठविणे भाग पडलें व मागाहून खुद त्यालाही तिकडे जावें लागलें. दुसरी, बादशहाचा मुलगा शहाजादा मुराद याचा जालना येथें अतोनात दारू पिण्यानें घडून आलेला मृत्यु. तिसरी, अबुलफझल आग्र्यास परत आल्यावर शहाजादा सलीम यानें मारेकऱ्याहात त्याचा केलेला वध हा शहाजादा अकबराच्या बाकी राहिलेल्या मुलांत सर्वांत वडील असून गादीचा वारस होता. ववदा वर्षे अकबर आपला दरबार लाहोरांतच भरवीत होता. परंतु दक्षिण हिंदुस्थानांत घडून आलेल्या नवीन गोष्टींमुळे त्यास १५९८ त तिकडेस जाणे भाग पडलें. त्याने अहमदनगर व अशीरगड शत्रूंना आपल्या स्वाधीन करावयास लाविलें, शहाजादा दानियल यास खानदेश व वऱ्हाड प्रांतांचा सुभेदार नेमिलें, व अहमदनगराखालीं मोडणारा प्रांत पूर्णपणें काबीज करण्यास अबुलफझल याची नेमणूक केली. नंतर इ० स० १६० या वर्षी वसंतांत बादशहा परत आग्र्यास गेला. ज्या गोष्टीमुळे अकबराला आग्र्यास जावें लागलें त्या मनाला फार क्लेश देणाऱ्या होत्या. बादशहास शहाजादा सलीमविषयीं बालपणापासू- नच फार चिंता वाटत होती. बालपण जाऊन तो मोठा झाला तरी देखील ही चिंता यत्किचित् कमी झाली नाहीं. सलीम जो पुढे जहानगीर बादशहा या नांवानें प्रसिद्ध झाला तो जात्या क्रूर स्वभावाचा होता व आपल्या मनोविकारांवर त्याला यत्कित सुद्धां दाब ठेवितां येत नव्हता. तो अबुलफझल याचा द्वेष करी, यार्चे आंतील खरें कारण असें होतें कीं बादशहाजवळ अवुलफझलचें जें वजन होतें त्याबद्दल शहाजाद्यास मत्सर वाटे, परंतु बाहेर सांगे तें कारण हैं कीं हटवादी मुसलमानांचीं ०