या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ अकबर बादशहा. जीं धर्मसंबंधी कोर्तीीं मतें अकबरानें झुगारून दिलीं, तीं मुख्यकरून ह्याच्याच उपदेशानें. अबुलफझल यास दक्षिण हिंदुस्थानांत पाठविलें आहे तेव्हां आतां मुलाचा क्रोधाग्नि शांत होईल अशी कांहीं वेळ अक- वरास आशा वाटली होती; व तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला, तेव्हां त्यानें सलीम यास आपल्या मार्गे राज्यकारभार चालविण्यास नेमिलें, आणि अजमीरचा सुभेदार हा किताब देऊन मेवाडच्या राण्याशीं पुनः उद्भवलेला संग्राम शेवटास लावण्याचे काम त्याजकडेस सोपविलें, शिवाय शहाजाद्याचा कल पाहून विवाह संबंधाने त्याचा नातलग, राणा मानसिंग यास त्याचे मदतीकरितां रवाना केलें. राणा मानसिंग व शहाजादा सलीम हे उभयतां मेवाडावर चाल करून निघाले इतक्यांत बंगाल्यांत बंडावा उद्भवल्याची बातमी येऊन पोर्होचली. राणा मानसिंग हा बंगाल्याचा सुभेदार असल्यामुळे या बंडाव्याचें निर्मूलन करण्याकरितां त्यास ताबडतोब तिकडे जाणें प्राप्त झालें. इकडे जवळ कोणी सलाहकार नसल्यामुळे सलीमच्या बुद्धत विपर्यास आला. त्याचे हुकुमांत प्रचंड सैन्य होते; तेव्हां बादशहा दक्षिणेंत गेला आहे, ही संधि साधून आपण गादी बळकवावी असें धाडसी कृत्य करण्याचा त्यानें निश्चय केला. ह्मणून मेवाडची स्वारी सोडून देऊन तो त्वरेनें सैन्यासह आम्यावर चाल करून गेला. तेथें किल्लेदारानें इमानास जागून किल्ल्याचीं दार्रे बंद केलीं. तेव्हां तो कग- बगीनें अलाहाबादेस गेला; व तेथील किल्ला काबीज करून त्यानें बिहार व अयोध्या हे प्रांत सर केले व राजा हा किताब धारण केला. ह्याच फितूरामुळे अकबर लगबगीनें दक्षिणेतून निघाला. शाहा- जाद्याचा स्वभाव पहिल्या पासून स्वच्छंदी व निरंकुश ; तेव्हां झालेलें कृत्य क्षणिक मनोविकारांच्या प्रबलतेमुळे झालें असावें असें मानून अकबरानें त्यास शासन न करितां सामोपचारानें वळवावें असा निश्चय केला व एक पत्र लिहून आश्वासन दिलें कीं, जर तूं पुनः राजनिष्ठ झालास तर तुज -