या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वा. १३५ वरील प्रेम कायम राहील, परंतु हट्ट करून आज्ञाभंग करण्याचे सोडून न दिर्केस तर मात्र भयंकर परिणाम होतील. हें पत्र शहाजादा सकीम ह्याचे हात पोहोंचलें तेव्हां अकबर थोड्या पण बादशाहींत नावजलेल्या निवडक अशा योद्ध्यांच्या सैन्यासह आग्र्या जवळ जवळ येत होता. सलीमचे डोळे आतां उघडले, आपर्के या वेळीं कांहीं चालणार नाहीं ; उलट दुराग्रहास पेटल्यास कदाचित् गादीसही मुकूं असें त्याला पक्के समजून आलें. आणि ह्मणून त्याने पत्राचा जबाब अगदीं नम्रतेचा दिला. परंतु त्याचे बोलण्यांत व करण्यांत मेळ नव्हता. पुढें कांहीं दिवसांनीं त्यास खबर लागली कीं बादशाही सैन्याचा बहुतेक भाग अद्याप दक्षिणेंतच आहे, तेव्हां तो इटावा येथें गेला, व मार्गात ठिकठिकाणी स्वार गोळा करूं लागला. त्याचा विचार असा होता कीं मोठा भव्य दळभार घेऊन नंतर मग ऐटीनें वडिलापाशीं जावें. परंतु अकबर असल्या काव्यानें फसला नाहीं. त्याने आपले पुत्रास असा हुकूम फरमाविला कीं तूं एकतर थोड्याशा शिपायांनिशीं आग्र्यास ये नाहींपेक्षां अलहाबादेस परत जा. शहाजादा सलीम यानें दुसरा मार्ग स्वीकारिला. त्या वेळेस त्यास बंगाल व ओरिसा हे प्रांत जहागीर देण्याचें अभिवचन ही दिलें होतें असें ह्मणतात. निदान व्यास हे प्रांत मिळाले खरे. हा अत्यंत नरमाईचा मार्ग स्वीकारण्याची प्रवृत्ति अकबरास कशामुळे झाली, आपलेपार्शी पुत्राचे मानानें दळभार कमी आहे असे दिसल्यामुळें, कीं स्वपुत्राशीं युद्ध करणें बरें न वाटल्यामुळे, कीं केवळ पुत्रवात्सल्यामुळे, -ह्याचा निर्णय आज मितीस करणे कठीण आहे. कदाचित ह्या तीन्ही गोष्टींचा परिणाम होऊन त्याने हा मार्ग स्वीकारला असेल. इतकें मात्र खरें कीं ह्या मार्गांत जरा कमकुवतपणाची झांक होती. आणि शेवटीं बंडखोर पुत्राकरितां आपण हार घेतली तिचा परिणाम ठीक झाला नाहीं असें बादशाहाला लवकरच दिसून आलें. सेलीमचा द्वेषभाव कधीही तृप्त होणारा नव्हता व o मनांत घेतलेले तो कधीं विसरत नसे. तेव्हां अबुलफझल हा दक्षिण-