या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ अकबर बादशहा. तून फक्त थोड्याशा परिवारानिशीं परत येत आहे अशी संधि पाहून सलीमनें ओरछा येथील राजाचे मार्फत त्यास वाटेंत गांठून ठार मारविलें. आपल्या मित्राचा खून झाल्यामुळे अकबराचे मनास मोठाच धक्का बसला. या अघोर कृत्यांत आपल्या मुलाचे अंग होतें हैं त्यास सुदैर्वेकरून अखेरपर्यंत कळलें नाहीं. या कृत्याबद्दल फक्त ओरछाचाच राजा गुन्हेगार आहे असें समजून त्याचें पारिपत्य करण्याकरितां बादशहानें आपली फौज त्यावर रवाना केली. तो गुन्हेगार राजा जंगलांत पळून गेला, व अकबर जिवंत होता तोपर्यंत - बादशहाचे मरणानंतर त्यास लपून राहणें जरूरच नव्हतें,-लपून राहून सैन्याच्या हात ह्मणून सांपडला नाहीं. इकडे बापलेकांचा समेट झाला; व बादशहानें आपल्या वडील मुलास आणखी एकदां मेवाडांतील दंगे नाहींसे करण्याकरितां खाना केलें. हे दंगेधोपे ह्मणजे राणा प्रतापसिंग याने मोंगलांच्या आधीन होण्याचे एकसारखें नाकारिलें, त्यामुळे झालेले. इ० स० १५७६ त हुडीघाट येथें पराभव झाल्यावर त्या राण्यानें जंगळांत पळ काढला. तेव्हां बादशाही सैन्य त्याच्या पाठीवर होतेच. देव एकसारखे इतके हात 'धुऊन पाठीस लागलेलें होतें कीं शेवटीं एकसारखी अपजयाचीच माळ लागली तेव्हां आपल्या कुटुंबासह व आपणावर विश्वास ठेवणाऱ्या मित्रां- सह मेवाडचा त्याग करून सिंधुनदाकांठीं दुसरे एखादें राज्य स्थापावें असा त्यानें निश्चय केला. याप्रमाणें तो निघाला होता; इतक्यांत त्याच्या प्रधानाच्या निरुपम स्वाभिभक्तीने मोगलांशी पुनः संग्राम चालू ठेवण्याची साधनें त्यास मिळाली. तेव्हां आणखी एकदां स्वारी करून नशीबाची परीक्षा पाहण्याचा त्यानें निश्चय केला. त्याने विजयपरंपरेमुळें बेसावध झालेल्या शत्रूवर एकदम उलटून त्यांचे पिछाडीचा भाग हाणून पाडिला ; व इ० स० १९८६ त चितूर आणि मंडलगड हे दोन किल्ले खेरीज- करून बाकीचा सर्व मेवाड प्रांत त्यानें परत आपल्या हस्तगत करून घेतला. तेव्हां चितूरचा संबंध तुटल्यामुळे त्यानें उदेपूर येथें व