या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ११ वॉ. १३७ राजधानी स्थापिली. या राजधानीवरूनच पुढे त्याचे संस्थानास उदेपूर हैं नांव प्राप्त झालें. इ० स० १५९७ त तो मरण पावला. त्या वेळपर्यंत त्यानें हार ह्मणून खाल्ली नाहीं. मागून त्याचा मुलगा आम्राराणा गादीवर बसला तो सांप्रत - ह्मणजे आपली हकीकत ज्या काळाला येऊन पोहोंचली आहे त्या काळी- मोगल सैन्यांनीं मेवाडांत चालविलेल्या एकंदर प्रयत्नांस दाद देत नव्हता. शहाजादा सलीम यास ही सोन्यासारखी संधि मिळाली होती. स्वाधीन केलेल्या सैन्याचा जर त्यानें हिंमतीनें व जोमानें उपयोग केला असता तर, मेवाड प्रांत पूर्णपर्णे सर करण्यास पुरे इतकें बल त्याजपाशीं होतें. परंतु असल्या गोष्टीची त्यास इतकी थोडी अभिरुचि होती की अकबराने त्यास शेवटीं परत बोलावून घेतलें व पूर्वी अलाहाबादचा कारभार जवळ जवळ स्वतंत्र राजाधिकार देऊन त्याजकडे सोपविला होता, तिकडे त्यास पुनः पाठविलें. तेथें तो आपल्या स्वभावास रुचणाऱ्या अशा बाहेरख्यालींत व जास्त वाईट अशा दुर्व्यसनांत गर्क राहिला. आपल्या कर्तव्याविषयींचा, लौकिकाविषयींचा व त्याचप्रमाणे आपल्या विश्वासू नौकर चाकरांच्या जीविताविषयींचा त्याचा वेपर्वाईपणा शेवटीं इतका वाढला कीं, समक्ष गेल्यानें कांहीं उपयोग होईल अशा आशेनें अकबर स्वतः अलाहाबादेस जाण्यास निघाला. परंतु तो कायतो दोन मजला वाट चालून गेला इत- क्यांत आपली आई अत्यावस्थ आहे अशी खबर आल्यामुळे त्यास परत जाणें भाग पडलें. तथापि आपणास ताळ्यावर आणण्याकरितां बादशहा आम्या- हून निघाला येवढ्या गोष्टीनेंच शहाजादा सलीम याचे विचारांनीं व कृतींनीं उलट घेतली. बापाचें येणें आपले इकडे होत नाहीं त्या अर्थी थोड्याशा परिवारानिशीं आपणच त्याच्या दरबारीं जावें असा त्यानें निश्चयं केला. तेथें जाऊन सलीम बादशहास शरण गेला, परंतु त्याने आपला वर्तनक्रम मात्र कांहीं सुधारला नाहीं. त्याचा वडील मुलगा शहाजादा खुनू याजबरो - बर ही त्याची भांडणे होऊन दरबारांत एक आणखी उपहासास कारण झालें. 18