या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ अकबर बादशहा. वस्तुतः बादशहास मुलांपासून सुख नव्हतें. आवळींजावळीं होतीं तीं बाळपणींच वारली. त्याचीं पहिली दोन मुलें चुकीने पहिला असें ह्मणतात, तो शहाजादा सलीम. तिसरा मुलगा, ज्याला चवथा मुलगा मुराद. याचा अंत कसा झाला हें पूर्वीच सांगितलें आहे. पांचवा दानियल, हा उंच, दिसण्यांत सुरेख, सुदृढ बांध्याचा, घोड्याचा व हत्तीचा शोकी, व हिंदुस्थानी काव्यें रचण्यांत चतुर असा असे. परंतु मुरादासारखेच याळाही दारूचें दुर्व्यसन लागलें होतें; व त्याच व्यसनामुळे या सुमारास त्याचा अंत झाला. या मृत्यूमुळे अकबराच्या मनास मोठा धक्का बसला. कारण या व्यसनातिशयापासून आपल्या मुलास निवृत्त करण्याची त्याने पराकाष्टा केली होती ; व शहाजाद्याकडून मी आतां हीं व्यसनें सोडून देत असें अभिवचनही त्यानें घेतलें होतें. राजवाड्यांत बादशहाचे अनेक नातू होते. त्या सर्वांत शहाजादा खुरामाहा बादशहाचा जीव कीं प्राण होता. हाच पुढें जहानगीर बादशहानंतर शहाजहान या नांवानें बादशहा होऊन गादीवर बसला. शहाजादा दानियल याच्या मृत्यूने व ज्या कारणानें तो मृत्यू आला त्यानें बादशहास फार दुःख झालें असावें; या वेळीं तो आजारी होता त्याचे दुखण्याचा परिणाम एकच होणार हे लवकरच उघड दिसूं लागलें. बाहशहाचे जवळीक अमीर उमराव व सरदार ह्यांच्या मनांत एकदम गादीच्या वारसाविषयींचा विचार उत्पन्न झाला. पैकी शहाजादा सलीम हाच कायतो निवंत होता. बादशहाचे मुलां- परंतु आग्र्यांत, अलाहाबादेत व इतर ठिकाणीं त्याचें जें वर्तन नजरेस आलें, त्या योगानें दरबारी मंडळीचें मन त्याचे विरुद्ध झालें होतें. त्याचा मुलगा शहाजा- दा खुनू हा विमल कीर्तीचा पुरुष आहे असें त्यांनीं ओळखून ठेविलें होतें. शिवाय शहाजादा खुखू याची आई जोधपूरच्या घराण्यांतील अस- ल्यामुळे त्याचें व राणा मानसिंग याचे अगदी जवळचे नातें होतें, आणि ह्वा कार्यक्षम राणा राज्यांतील एक कर्ता पुरुष होता. दुसरें, खुलूनें, अकब-